NHM Recruitment 2022 : साताऱ्यात नोकरीची संधी!! जिल्हापरिषदेअंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; मुलाखतीसाठी हजर रहा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा जिल्हा परिषद, सातारा (NHM Recruitment 2022) अंतर्गत योग प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा जिल्हा परिषद, सातारा

पदाचे नाव – योग प्रशिक्षक

पद संख्या – 27 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (PDF जाहिरात पहा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

अर्ज फी – रु. 300/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – कोविड वॉर्ड रूम, तळमजला, NHM कार्यालयच्या खाली, जिल्हा परिषद, सातारा

मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

निवड प्रकिया – (NHM Recruitment 2022)

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.
  • मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 ते 02:00 निश्चित करण्यात आली आहे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

(सूचना – भरती पश्चात रिक्त राहणाऱ्या प्रा. आ. केंद्राच्या ठिकाणाकरिता दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्रत्यक्ष मुलाखत ठेवण्यात येईल.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com