करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अनेक (Netflix Bumper Job Openings) दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या तंत्रज्ञानाच्या बाजूने आणि याच्या विरुद्ध अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही भीती कितपत खरी ठरते, हे येणारा काळच सांगेल, पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी नक्कीच मिळू शकते.
AIला हॉलिवूडमध्ये होतोय विरोध
Netflix या ऑनलाइन कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपनीने अलीकडेच एक जागा भरली आहे. कंपनी सध्या AI प्रॉडक्ट मॅनेजर शोधत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल हॉलीवूडमध्ये प्रचंड विरोध होत असताना नेटफ्लिक्सने एआय प्रॉडक्ट मॅनेजरची जागा भरत आहे. हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशन आणि इतर संस्था मनोरंजन उद्योगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदमवरील वाढत्या अवलंबित्वामुळे संतप्त आहेत.
नेटफ्लिक्स देणार 9 लाख डॉलर पगार
नेटफ्लिक्सच्या या जॉबसाठी कंपनी एआय प्रॉडक्ट मॅनेजरच्या पदासाठी 9 लाख डॉलर पर्यंत वार्षिक पगार देऊ करत आहे, ज्याची रक्कम सुमारे 7.4 कोटी रुपये आहे. (Netflix Bumper Job Openings)
एआय प्रॉडक्ट मॅनेजरचे काम नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करणे आणि कंटेंट तयार करण्यासाठी एआयचा वापर करणे हे असेल.
‘या’ पदासाठीही लोकांची आवश्यकता
एआय प्रॉडक्ट मॅनेजर व्यतिरिक्त, नेटफ्लिक्सला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित इतर लोकांची देखील आवश्यकता आहे. कंपनीने टेक्निकल डायरेक्टरची जागा भरली आहे. या पदासाठी कंपनीकडून वार्षिक 4.5 लाख ते 6.5 लाख डॉलर्स पगाराची ऑफर दिली जात आहे. याचा (Netflix Bumper Job Openings) अर्थ नेटफ्लिक्स एका वर्षात 3.70 कोटी ते 5.35 कोटी रुपये पगार टेक्निकल डायरेक्टरला देईल. देश आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्या आता आपल्या विविध कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा अधिकाधिक वापर करत आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AIच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डने जगाला नवीन तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com