NEET UG 2022 : NTA लवकरच जारी करणार NEET UG परीक्षेची Answer Key; कशी करायची डाउनलोड?

करिअरनामा ऑनलाईन । National Testing Agency (NTA) लवकरच NEET Answer Key जारी करणार (NEET UG 2022) आहे. NEET UG 2022 परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आली होती. यंदा 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. Answer Key जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन Answer Key तपासू शकतील.

NEET 2022 च्या Answer Key सोबत, परीक्षेची OMR शीट देखील NTA द्वारे सामायिक केली जाईल. यासोबतच Answer Key वर आक्षेप घेण्यासाठी लिंक सक्रिय केली जाईल. मात्र, यासाठी उमेदवारांना त्यासाठी फी भरावी लागणार आहे. आक्षेपांचे निराकरण झाल्यानंतर अंतिम Answer Key आणि NEET चा निकाल जाहीर केला जाईल.

अशी डाउनलोड करा Answer Key – (NEET UG 2022)

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या.
  2. येथे मुख्य पृष्ठावर, ‘NEET 2022 Answer Key’ या लिंकवर क्लिक करा.
  3. आपले लॉगिन तपशील ऍड करा आणि सबमिट करा.
  4. NEET 2022 Answer Key स्क्रीनवर दिसेल.
  5. भविष्यातील वापरासाठी तुम्ही ते डाउनलोड आणि प्रिंट करू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com