NEET 2024 : नागपूरची पोरं हुश्शार!! NEET परीक्षेत दोघांनी मिळवले पैकीच्या पैकी मार्क

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात (NEET 2024) प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एंन्टर्स टेस्ट (NEET Exam) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले आहे. या निकालात नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच संपूर्ण भारतातून पहिली रॅंक प्राप्त केली आहे. वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान अशी या दोघांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत 720 पैकी 720 म्हणजेच पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले आहेत. या निकालामुळे नागपूरचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे.

पैकीच्या पैकी मार्क मिळवून केला विक्रम
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे 5 मे रोजी नीटची परीक्षा (NEET 2024) घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून 24 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 89 विद्यार्थ्यांनी AIR 1 रॅंक प्राप्त केली आहे. यावर्षी नागपुरातून जवळपास 19 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत.

असा केला अभ्यास
वेदचे वडील डॉ. सुनील शेंडे हे ENT सर्जन आहेत तर आई डॉ. शिल्पा शेंडे या आयजीजीएमसीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. वेदने दहावीनंतर नीट परीक्षेची तयारी सुरू केली. आपल्याला (NEET 2024) डॉक्टर व्हायचं आहे हे ध्येय वेदने लहानपणापासून ठेवलं होतं. तो सांगतो; “नीट परीक्षेचा अभ्यास करताना सातत्यता आणि एकाग्रता खुप महत्त्वाची आहे. मी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून स्वतःचा बेस पक्का केला. शिवाय एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले. दडपण न ठेवता रिलॅक्स राहून अभ्यास केला. दररोज मी 8 तास अभ्यास करायचो. त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो.”

सोशल मीडियापासून लांब रहा (NEET 2024)
सुरुवातीपासून डॉक्टर होण्याची इच्छा असलेल्या क्रिष्णमूर्ती शिवान याने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले; “डॉक्टर होण्याचं स्वप्न लहानपणीच पाहिलं होतं. यासाठी NEET परीक्षेची तयारी दहावीनंतर सुरू केली त्यामुळे आज हे यश पाहता आले.” तो पुढे सांगतो; “नियमित अभ्यास केल्याशिवाय यशाचा मार्ग सापडत नाही. दररोज एकाग्रतेने 7 ते 8 तास अभ्यास करणे गरजेचे आहे. हे करत असताना चाचणी परीक्षा सोडविणे आणि चुका दुरुस्त करणे सुध्दा महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण सोशल मीडियापासून जेवढे दूर राहू तेवढा आपल्याला जास्त फायदा होतो.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com