NDA Entrance Exam 2024 : 12 वी नंतर NDA प्रवेशासाठी द्या CET; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, परीक्षा, मुलाखती विषयी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यात खडकवासला येथे NDA म्हणजेच (NDA Entrance Exam 2024) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याचे काम ही प्रबोधिनी करते. बारावी पास झाल्या नंतर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी NDA तसेच नेव्हल अॅकेडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रॅंचसाठी 400 विद्यार्थ्यांची यापैकी (370 मुले आणि 30 मुली) संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. यासाठी पुढील प्रवेश परीक्षा दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून त्यासाठीची जाहिरात १५ मे रोजी upsc. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.

ज्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींची जन्मतारीख २ जानेवारी २००६ आणि १ जानेवारी २००९ या दरम्यान असेल त्यांना दि. 4 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने upsconline. nic. in या संकेतस्थळावर (NDA Entrance Exam 2024) अर्ज भरता येईल. या जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा केंद्रे, शारीरिक तंदुरुस्तीचे निकष या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती दिली आहे. इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शारीरिक तंदुरुस्ती निकषांमध्ये आपण बसतो की नाही याची खातरजमा करूनच अर्ज भरावेत जेणेकरून नंतर त्यांची निराशा होणार नाही.

परीक्षेचे स्वरूप – (NDA Entrance Exam 2024)
1. या प्रवेशासाठीची लेखी परीक्षा ऑब्जेक्टीव्ह (बहु पर्यायी) स्वरुपाची असते.
2. अडीच तासांचे दोन पेपर असतात.
3. पहिला पेपर गणिताचा 300 मार्कांचा असतो आणि दुसरा पेपर जनरल अबिलिटीचा 600 मार्कांचा असतो.
4. या दुसऱ्या पेपरमध्ये 200 गुणांचा इंग्रजीचा तर 400 गुणांचा फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, भूगोल, ताज्या घडामोडी अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
5. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे.
6. परीक्षेनंतर साधारण तीन महिन्यांनी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होतो, जो upsc. gov. in या संकेतस्थळावर बघता येतो.

मुलाखत –
1. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांत SSB इंटरव्ह्यू साठी बोलावले जाते.
2. हा इंटरव्ह्यू प्रदीर्घ म्हणजे पाच दिवस चालतो ज्यामध्ये दोन टप्पे असतात.
3. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण (NDA Entrance Exam 2024) विकासाचा कस लागतो. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाते.
4. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात.

NDA चे संपूर्ण शिक्षण, निवास, भोजन मोफत असते
सर्व स्तरात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या क्षेत्रात (Army, Navy, Airforce) पुढील प्रशिक्षण देऊन भारतीय संरक्षण दलाच्या सेवेत अधिकारी म्हणून एक (NDA Entrance Exam 2024) लाख रुपये महिना या पगारावर दाखल करून घेण्यात येते.
NDA चे संपूर्ण शिक्षण, निवास, भोजन मोफत असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com