करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला NDA एंट्रन्स परीक्षेचा अभ्यासक्रम (NDA Career) आणि या परीक्षेचं पॅटर्न नक्की कसं असतं तसंच यासाठी काय पात्रता असते हे सांगणार आहोत.
दरवर्षी लाखो तरुण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज करतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवाराला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच National Defence Academy येथे प्रशिक्षण (NDA Career) घ्यावे लागते. NDA ध्ये फक्त पुरुषांनाच प्रशिक्षण दिले जाते, असे बहुतेकांना वाटते, परंतु तसे नाही. एनडीएमध्ये महिलांनाही भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी, तुम्हाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला NDA एंट्रन्स परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या परीक्षेचं पॅटर्न, आवश्यक पात्रता याविषयी सांगणार आहोत. जाणून घेऊया सविस्तर…
एंट्रन्ससाठी आवश्यक पात्रता (NDA Career)
- NDA परीक्षेसाठी, उमेदवाराने 10+2 मध्ये विज्ञान शाखेसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
- भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलासाठी ही पात्रता अनिवार्य आहे.
- तर भारतीय सैन्यासाठी कोणत्याही प्रवाहातून 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- एनडीए प्रवेश परीक्षेसाठी उमेदवाराचे वय 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे असावे. (NDA Career)
- केवळ अविवाहित उमेदवारच NDA प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
- एनडीएमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
- फक्त भारतीय नागरिक NDA परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
असं असतं Exam Pattern
- एनडीए प्रवेश परीक्षेतील लेखी परीक्षेत 2 पेपर असतात.
- यामध्ये पहिला पेपर गणिताचा आणि दुसरा पेपर सामान्य क्षमता चाचणीचा असतो. (NDA Career)
- इयत्ता 11वी आणि 12वीचे विषय गणिताच्या पेपरमध्ये दिले आहेत. तर पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि GK भाग A आणि भाग B मध्ये असतो.
कोणाला कुठे मिळतो प्रवेश
एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना तीन वर्षांसाठी पुण्यात प्रशिक्षण दिले जाते. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांची तीन वर्षांतील कामगिरी पाहून लष्कर, नौदल (NDA Career) आणि हवाई दलातून कोणतेही एक दल मिळते. त्यानंतर जे विद्यार्थी आर्मी निवडतात ते आयएमए डेहराडूनला जातात, नेव्हीचे इंडियन नेव्हल अकादमी, केरळमध्ये जातात आणि एअर फोर्सचे विद्यार्थी एएफए हैदराबादला जातात. जिथे ते आणखी एक वर्ष प्रशिक्षण घेतात. त्यानंतरच ते भारतीय लष्कराचा भाग बनतात.
1955 मध्ये झाली NDA ची स्थापना
भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याच्या उद्देशाने 1955 मध्ये पुण्यात खडकवासला येथे ‘एनडीए’ अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. बारावीनंतर (NDA Career) येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी ‘एनडीए’; तसेच ‘नेव्हल अॅकॅडमी’च्या एक्झिक्युटिव्ह ब्रँचसाठी चारशे विद्यार्थ्यांची यामध्ये 381 मुले आणि 19 मुलींची संपूर्ण देशभरातून निवड केली जाते. यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रवेश परीक्षा घेतली जाते.
कशी असते NDA ची परीक्षा? (NDA Career)
नॅशनल डिफेन्स अकादमी ही भारतातील अग्रगण्य जॉईन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे; जी भारतीय सशस्त्र दलांना म्हणजे आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही यांना प्रशिक्षण देते. ज्या भारतीय तरुणांना आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये अधिकारी व्हायचे आहे, त्यांना एनडीएकडून प्रशिक्षण घ्यावे लागते. NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ही परीक्षा UPSC द्वारे देशातील 41 केंद्रांवर घेतली जाते. एनडीए प्रवेश परीक्षा ही भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाची एकत्रित परीक्षा आहे. एनडीए लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना एनडीए आणि नेव्हल अकादमीमध्ये प्रवेश दिला जातो.
अशी असते लेखी परीक्षा
- या प्रवेशासाठीची लेखी परीक्षा ‘ऑब्जेक्टिव्ह’ स्वरूपाची असते.
- ज्यामध्ये अडीच तासांचे दोन पेपर असतात.
- पहिला पेपर गणिताचा तीनशे मार्कांचा असतो. (NDA Career)
- दुसरा पेपर ‘जनरल ऍबिलिटी’चा सहाशे मार्कांचा असतो.
- यामध्ये दोनशे गुणांचा इंग्रजीचा, तर चारशे गुणांचा फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, भूगोल, ताज्या घडामोडी अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ असते.
- परीक्षेनंतर साधारण तीन महिन्यांनी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होतो जो upsc.gov.in या संकेतस्थळावर बघता येतो.
अशी होते मुलाखत –
- या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांत मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- ही मुलाखत पाच दिवस चालते. ज्यात दोन टप्पे असतात.
- यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा कस लागतो. यातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाते.
- निवडलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी घेऊन उत्तीर्ण होतात.
- त्यानंतर त्यांच्या क्षेत्रात (आर्मी/नेव्ही/एअरफोर्स) त्यांना पुढील प्रशिक्षण देऊन भारतीय संरक्षण दलांच्या सेवेत अधिकारी म्हणून एक लाख रुपये महिना या पगारावर दाखल करून घेण्यात येते.
- ‘एनडीए’चे संपूर्ण शिक्षण, निवास, भोजन मोफत असते.
थोडक्यात महत्वाचे –
- एनडीए मध्ये जाण्यासाठी बारावीपर्यंत सायन्स शाखा घेणे फायद्याचे असले तरी सक्तीचे नाही. आर्ट्स, कॉमर्स चे विद्यार्थी; पण येथे प्रवेश घेऊ शकतात. मात्र, यासाठी अकरावी, बारावीला गणित विषय घेणे फायद्याचे ठरते. या (NDA Career) विद्यार्थ्यांना फक्त आर्मीमध्येच जाता येते.
- एनडीए मध्ये प्रवेशासाठी जास्तीत जास्त संधी घ्यायच्या असतील, तर एनडीए प्रवेश परीक्षेची पहिली संधी अकरावी संपल्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यात घ्यावी, म्हणजे बारावीनंतरच्या सप्टेंबर महिन्यात शेवटची संधी मिळू शकते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com