[Gk update ]  नॅशनल बुक ट्रस्ट (NBT)  “कोरोना स्टडीज सीरिज” सुरू करणार

करिअरनामा । नॅशनल बुक ट्रस्ट आता ‘कोरोना’ संबधित वाचकांच्या गरजा भागतील अशा सर्व वयोगटातील लोकांसाठीवाचन साहित्य पुरविण्यासाठी ‘कोरोना स्टडीज सीरिज’ नावाची प्रकाशन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध विषयात भारतीय भाषांमध्ये परवडणारी पुस्तके आणून वाचकांना “कोरोना ससंर्ग काळात” विविध बाबींसह तयार करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी NBT ने योगदान देण्याचे ठरवले आहे.

‘कोरोना स्टडीज सिरीज’ ओळखल्या जाणाऱ्या ह्या लेखन शैलीत योगदान देण्यास इच्छुक लेखक आणि संशोधकांना एक योग्य व्यासपीठ देखील प्रदान करण्यात येणार आहे.

पुढील विभागांसाठी पुस्तके अभ्यास गट तयार करतीलः

1. कोरोना व्हायरस (कोविड 19) प्रभावित कुटुंब
2. वृद्ध लोक
3. माता / महिलांवर विशेष लक्ष असणारे पालक
4.  मुले व किशोरवयीन मुले
5. व्यावसायिक आणि कामगार
6. कोरोना वॉरियर्स: वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा प्रदाता
7. भिन्न सक्षम, विशेष गरजा आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक लोकसंख्या

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:-

नॅशनल बुक ट्रस्ट चे अध्यक्ष: गोविंद प्रसाद शर्मा.

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया ही एक सर्वोच्च संस्था असून ती 1957 मध्ये भारत सरकारने स्थापित केली.

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक संवर्धन करण्याची राष्ट्रीय संस्था आहे.

———————————————————–स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-