करिअरनामा ऑनलाईन । पंततप्रधान नरेंद्र मोदी (National Education Policy) यांनी आज (29 जुलै) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचं उद्घाटन केलं. नवी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडप येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना भविष्यातील शैक्षणिक बदलांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 10वी आणि 12वी ऐवजी नवीन शिक्षण प्रणाली राबवण्यात येणार असून CBSE अभ्यासक्रमात बदल होणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. भारताला संशोधन आणि नवीन कल्पनांचे केंद्र बनवण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
10+2 ऐवजी येणार 5+3+3+4 शिक्षण पद्धत
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपारिक ज्ञान प्रणालीपासून भविष्यातील तंत्रज्ञानाला संतुलित पद्धतीने महत्त्व देण्यात आले आहे. देशातील शिक्षणतज्ज्ञांनी संशोधन परिसंस्था मजबूत (National Education Policy) करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. देशातील विद्यार्थ्यांना नवीन व्यवस्थेची चांगली माहिती आहे. 10+2 शिक्षण पद्धतीच्या जागी 5+3+3+4 शिक्षण पद्धत सुरू केली जात आहे. शिक्षणाची सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होईल. यामुळे देशात एकरुपता येईल”; असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
देशातील सर्व CBSE शाळांसाठी एकच अभ्यासक्रम (National Education Policy)
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “येत्या काळात देशातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम लागू केला जाईल. यासाठी 22 भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत. दरम्यान यावेळी ‘पीएमएसश्री’ योजनेचा पहिला हप्ताही जारी करण्यात आला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतील शिक्षणावरही पंतप्रधान मोदींनी भर दिला. तरुणांना त्यांच्याकडील कौशल्याऐवजी त्यांच्या भाषेच्या आधारे न्याय देणे हा त्यांच्यावर (National Education Policy) सर्वात मोठा अन्याय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. मातृभाषेतील शिक्षणामुळे आता खरा न्याय भारतातील युवा कलागुणांना मिळणार आहे. सामाजिक न्यायासाठीही हे महत्त्वाचे पाऊल ठरेल; असंही मोदी म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com