करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण मंत्रालयाने (National Awards to Teachers 2024) ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अधिसूचनेनुसार हा पुरस्कार देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्था/पॉलिटेक्निकमधील सर्व प्राध्यापकांसाठी देण्यात येणार आहे. पदक आणि प्रमाणपत्रासह 50,000 रुपयांचे रोख बक्षीस असं पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट awards.gov.in वर जाऊन नोंदणीसह इतर माहिती डाउनलोड करू शकतात.
ही आहे आवश्यक पात्रता –
1. नोंदणी करणारी व्यक्ती नियमित विद्याशाखेची सदस्य असणे आवश्यक आहे.
2. तसेच पदवी/किंवा पदव्युत्तर स्तरावर किमान 5 वर्षांचा पूर्णवेळ अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3. पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
हे उमेदवार पुरस्कारासाठी पात्र नाहीत (National Awards to Teachers 2024)
कुलगुरू/संचालक/प्राचार्य (नियमित किंवा कार्यवाहक) अर्ज करण्यास पात्र नाहीत. मात्र, ज्या व्यक्तींनी यापूर्वी अशी पदे भूषवली आहेत. परंतु वय 55 वर्षांपेक्षा कमी आहे आणि अद्याप सक्रिय सेवेत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
शिक्षक (उच्च शिक्षण) 2024 साठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेत दोन टप्पे असतील –
1. उमेदवारांच्या प्रारंभिक शॉर्टलिस्टिंगसाठी एक प्राथमिक शोध आणि स्क्रीनिंग समिती.
2. निवडलेल्या उमेदवारांमधून पुरस्कार विजेत्यांच्या अंतिम निवडीसाठी ज्युरी समिती.
या तारखेपर्यंत करता येईल अर्ज –
पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत 20 जून 2024 आहे. दरवर्षी एकूण 35 पुरस्कार दिले जातात. श्रेणी I (उच्च शैक्षणिक संस्थांचे शिक्षक) 25 पुरस्कार आणि श्रेणी II (पॉलिटेक्निक संस्थांचे शिक्षक) मध्ये 10 पुरस्कार प्रदान केले जातात. भारताचे माजी राष्ट्रपती आणि एक उल्लेखनीय (National Awards to Teachers 2024) शिक्षक, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर, शिक्षक दिनी निवडलेल्या पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला जाईल. या संदर्भात सरकारने जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे CLICK करा. तसेच अधिक माहितीसाठी https://www.awards.gov.in/Home/Awardpedia या वेबसाइटला भेट द्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com