करिअरनामा ऑनलाईन । झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी असलेल्या (Nari Shakti) आशा सिन्हा एकेकाळी महिन्याला पाच हजार रुपये पगाराची नोकरी करायच्या. या तुटपुंज्या पगारात गरजा भागत नव्हत्या. कमाईचं दुसरं साधन शोधणं गरजेचं होतं. यासाठी त्यांनी आपल्याला वेगळं काही करता येऊ शकतं का यासाठी शोध मोहीम सुरु केली. सरतेशेवटी त्यांनी ज्यूट (ताग) व्यवसायामध्ये प्रवेश केला. या व्यवसायाच्या माध्यमातून सध्या त्या लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.
‘संकटांचा धिराने सामना केला’ (Nari Shakti)
आशा सिन्हा सांगतात; की “एक काळ असा होता ज्यावेळी आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली होती. नोकरीतून मिळणाऱ्या पगारात घर खर्च भागत नव्हता. वेगळं काहीतरी करण्याची गरज होती. यासाठी ज्यूट व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. आता 12 वर्षे झाली मी हा व्यवसाय करत आहे. यादरम्यान अनेक आव्हानं आली. पण, त्यांचा धीरानं सामना केला. त्याचाच परिणाम म्हणून आज मी माझं संपूर्ण कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे.”
मार्केटचा अभ्यास करून काम सुरु केलं
मार्केटमधील मागणीचा अभ्यास करून ज्यूटपासून अनेक प्रकारच्या पिशव्या बनवायला सुरुवात केल्याचं आशा सांगतात. “या व्यवसायातील मर्यादा आणि ताकद चांगल्या प्रकारे समजून घेतली. आमच्या लक्षात आलं की, रांचीमध्ये विकण्यासाठी ज्यूटच्या पिशव्या कोलकात्याहून घाऊक दरानं विकत घ्याव्या लागतात. लहान विक्रेत्यांसाठी कोलकात्याहून 20 ते 25 पिशव्या आणणं कठीण होतं. (Nari Shakti) त्यामुळे या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ज्यूटच्या पिशव्या बनवायला सुरुवात केली. जे व्यापारी कोलकात्यातून ज्यूटच्या पिशव्या आणायचे ते व्यापारी आता आमच्याकडून त्याच दर्जाच्या पिशव्या खरेदी करत आहेत”; असं आशा सांगतात.
300 महिला करतात काम
आशा म्हणाल्या, हे काम मी एकटीनं सुरू केलं होतं. हळूहळू कामाचा व्याप वाढू लागला तसं यामध्ये आणखी महिला सहभागी झाल्या. सध्या एकूण 300 महिला एकत्र काम करत आहेत. आम्ही एक हजारपेक्षा जास्त प्रकारची ज्यूट उत्पादनं तयार करतो. आमच्याकडे (Nari Shakti) कॉन्फरन्स बॅग, पहाडिया बॅग, सेमिनार बॅग, स्कूल बॅग, वुमन पर्स, वुमन साईड बॅग, छोटी पर्स, भाजी बॅग अशा विविध प्रकारच्या बॅग तयार होतात.
या शहरांमध्ये जातो माल
आशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तयार केलेली उत्पादनं झारखंड व्यतिरिक्त दिल्ली, बेंगळुरू, सुरत, बिहार आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी कुरिअरद्वारे पाठवली जातात. दर महिन्याला सुमारे दोन हजार ज्यूट उत्पादनं इतर शहरांमध्ये कुरिअरद्वारे वितरित केली जातात. या (Nari Shakti) व्यतिरिक्त ही उत्पादने झारक्राफ्ट आणि कुसुम, पलाश लोकल मार्केट, रांचीतील घाऊक मार्केट आणि जत्रेतही विकली जातात.
तुम्हालाही आशा सिन्हा यांच्याकडील सुंदर ज्यूटच्या पिशव्या घ्यायच्या असतील तर 8340117920 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com