करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संयम असावा लागतो म्हणतात ते काही खोटे नाही. वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या ठाणगाव येथे राहणारे पोळेकर कुटुंब होय. नकुल शंकर पोळेकर यांनी १६ पूर्व १२ मुख्य परीक्षा आणि २ मुलाखतीनंतर ते आता नायब तहसीलदार झाले आहेत. अनेकदा अपयश पचवून देखील त्यांनी धीर सोडला नाही. ते सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला. २ – ३ प्रयत्नानंतर लोक धीर सोडतात मात्र नकुल यांचे इतक्या प्रयत्नांसाठी कौतुक केले जाते आहे.
गावात प्राथमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मामाच्या गावी जावे लागले होते. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठ येथे शिक्षण घेऊन एकेठिकाणी ६ महिने जॉब केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेकडे मार्ग वळविला. आपण लोकहितासाठी प्रशासनात जाऊन काहीतरी करावे असे वाटल्यामुळे २०१६ साली पूर्णतः स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. आईवडील आणि मित्रमंडळी यांच्याकडून नेहमीच प्रोत्साहन मिळाले म्हणूनच संयम ठेवू शकलो असेही ते म्हणाले.
मांझी सिनेमातील ‘छोडेंगे नहीं जबतक तोडेंगे नहीं’ या संवादाने मी प्रेरित झालो आहे. म्हणूनच माझा हा प्रवास सुकर झाल्याचे ते म्हणाले. छोट्याशा अपयशाने खचून जाणाऱ्या आजच्या तरुण वर्गासाठी नकुल पोळेकर नक्कीच एक आदर्श ठरतील. यात शंका नाही.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com