मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी

करिअरनामा । मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासाठी महत्वाची बातमी. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नाव नोंदवायचे आहे.

दरम्यान, पदवीसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. पहिली प्रवेश यादी ४ऑगस्टला जाहीर केली जाईल.

तसेच ८ जुलैपासून विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही अडचणी आल्यास ०२०- ६६८३४८२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना हमीपत्र फॉर्म भरुन कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमिपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर केल्यावर अंतिम प्रवेश दिला जाईल.

प्रवेशाचे वेळापत्रक
अर्ज विक्री : २४ जुलै ते ४ ऑगस्ट
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया : २३ जुलै ते ४ ऑगस्ट
प्रवेश अर्ज सादर करणे : २७ जुलै ते ४ ऑगस्ट

पहिली गुणवत्ता यादी : ४ ऑगस्ट
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : ५ ते १० ऑगस्ट

दुसरी गुणवत्ता यादी : १० ऑगस्ट
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : ११ ते १७ ऑगस्ट