मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण संस्थेचे प्रवेशांचे वेळापत्रक जारी

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १९ जानेवारी २०२१ पासून विद्यार्थांना अर्ज भरता येतील. या प्रवेश प्रक्रियेत बारावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

करोनामुळे अनेक अभ्यासक्रमांचे निकाल उशिरा लागले आहेत. तसेच अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहे.  आर्थिक टंचाई आली होती. त्यामुळे पालकांनी शुल्काअभावी पाल्यांचे प्रवेश घेतलेले नाहीत. तसेच बारावी फेरपरीक्षेचा निकालही विलंबाने लागल्याने विद्यार्थ्यांना आता आयडॉलमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. दूर व मुक्त शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१७ मध्ये नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेला जुलै आणि जानेवारी या दोन सत्रांच्या प्रवेशाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार गत वर्षी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

जानेवारी सत्राच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय सत्र एफवाय बीए, एफवाय बीकॉम, एमएचे सेमिस्टर एक आणि दोनच्या इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. तसेच एमकॉम सेमिस्टर एक आणि दोन या वर्षांचीही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एसवायबीए, एसवायबीकॉम सोबतच एमए व एमकॉमचे पार्ट दोनची ही प्रवेश प्रक्रिया या कालावधीत होईल. प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना ३० जानेवारीपर्यंत आयडॉलच्या वेबसाइटवरून अर्ज भरता येईल.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com