MPSC UPSC Exam : MPSC/UPSC च्या वेळापत्रकात पुन्हा बदल; वय मर्यादा संपत आलेल्या उमेदवारांपुढं प्रश्न चिन्ह

MPSC UPSC Exam
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय (MPSC UPSC Exam) सेवेत जाण्यासाठी लाखो तरुण-तरुणी जिवाचं रान करतात. कोरोना कालखंड उलटल्यानंतर परीक्षा व निकालाचे कामकाज सुरळीत झाले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेले आहे. याचा मोठा फटका वयोमर्यादेच्या काठावरील परीक्षार्थींना बसणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये येत्या २८ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित (MPSC UPSC Exam) नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा, तर १९ मे रोजी होणाऱ्‍या समाजकल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात (UPSC) परीक्षादेखील पुढे गेल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर जाहीर होणार आहेत. कोरोना काळात दोन वर्षे परीक्षा थांबल्याने अनेकांची (MPSC UPSC Exam) संधी हुकली आहे. आताही परीक्षा पुढे गेल्याने परीक्षार्थींच्या अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडणार हे निश्चित. तसेच सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे या परीक्षांसाठी ठराविकच संधी व वयाची मर्यादा असते. वय वाढत गेल्याने जे परीक्षार्थी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत, अशांना परीक्षा पुढे गेल्याचा फटका बसणार आहे.

स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांमध्ये चुरस वाढलेली पहायला मिळते. एकीकडे स्पर्धा वाढलेली असताना दुसरीकडे महामारी, पेपरफुटी, निवडणुका अशा कारणांनी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याने या विद्यार्थ्यांच्या मार्गात वयाचा अडसर निर्माण होत आहे. अशातच मागील काही वर्षांपासून (MPSC UPSC Exam) मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्याने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न टिकल्याने आरक्षणावर नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांवर पुन्हा एकदा टांगती तलवार आली आहे; तर काही परीक्षांच्या निकालावर स्थगिती आल्याने त्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत. स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या तरुणांचा जीवनात स्थिर होण्यासाठी सध्या संघर्ष सुरु आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com