MPSC Success Story : ना कोचिंग…ना सोयी सुविधा..; शेतात राबला…घाम गाळला..; घरीच अभ्यास करुन झटक्यात झाला फौजदार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागात राहून (MPSC Success Story) कोणताही क्लास किंवा कोणतीही कोचिंग क्लास न लावता, सिन्नरच्या वैभवने अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. अभ्यास करण्यासाठी त्याने शहराची वाट तर धरली नाहीच पण त्याने गावातच राहून तेही घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं आहे. वैभव बाळासाहेब गुंजाळ असं या तरुणाचं नांव आहे. गावातील पहिला फौजदार होण्याचा मान त्याने मिळवला आहे. सुळेवाडी या छोट्या गावातुन वैभवने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परिक्षेत यश मिळून सर्वांना सुखद धक्का दिला आहे.

डोंगराळ भागातील जेमतेम शेतीवर चालायचा कुटुंबाचा उदरनिर्वाह
सुळेवाडीचे स्व. बाळासाहेब किसन गुंजाळ यांचा थोरला मुलगा वैभव. गुंजाळ परिवाराला कसण्यासाठी सुळेवाडीच्या डोंगराळ भागात जेमतेम शेती आहे. 2019 मध्ये वैभवच्या वडीलांचे आकस्मित निधन झाले. यानंतर कुटुंबाची जबाबदारी वैभवची आई मनिषा गुंजाळ यांनी उचलली. आईने मोठ्या कष्टाने मुलांना शिकवलं. वैभवला आईच्या कष्टाची जाणीव होती. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी लवकरात लवकर नोकरी मिळावी या उद्देशाने त्याने इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं. त्यानुसार संगमनेर येथील महाविद्यालयात त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तो चांगल्या मार्काने उत्तीर्णही झाला. वैभवला शालेय जीवनापासून खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने पोलीस खात्यात भरती होण्याचे ध्येय स्वस्थ बसू देत नव्हते.

इंजिनिअर असूनही दिली MPSC (MPSC Success Story)
मॅकेनिकल इंजिनिअर होऊनही वैभवने पुन्हा स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरवात केली. मात्र त्याच काळात जगभरात कोरोनाचे संकट येवून धडकले. वैभवचा अभ्यास चालू होता, मात्र आयोगाची एकही परीक्षा होत नव्हती. सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत होत्या. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर परीक्षा होवू लागल्या. तोपर्यंत वैभवचा अभ्यास तयार होता. त्याने कोणताही क्लास न लावता आजूबाजूच्या मित्रांना सोबत घेऊन अभ्यास केला होता. त्याने सुरवातीला पोलिस उप निरीक्षक पदाची परीक्षा दिली. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्याने पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. शेवटी मुलाखतीची तयारी देखील चांगली झाल्याने त्याची लगेचच PSI पदावर निवड झाली.

गावाकडे राहून केला अभ्यास
वैभवने घरीच राहून शेती सांभाळून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. त्याची आई मनिषा यांनी लहान मुलगा भुषण याला पुण्यात UPSC ची तयारी करण्यासाठी पाठविले आहे. गुंजाळ भावंडांची बहिण उषा इंजिनिअर असून ती पुण्यात नोकरी करते. तीन मुलांना आई मनिषा गुंजाळ (MPSC Success Story) यांनी मोलमजुरी करून शिकवले. मुलांनी स्वबळावर करिअरच्या वाटा शोधल्या आहे. आज वैभव आणि त्याची भावंडे यांनी आपल्या मनाप्रमाणे वाटा निवडून आपले करिअर घडवले आहे. सुळेवाडी सारख्या छोट्या गावात राहून वैभवने कमाल केली असून त्याने गावातील पहिला फौजदार होण्याचा  मान मिळवला आहे.

लहानपणापासून खाकी वर्दीचं आकर्षण 
“मला लहान पणापासून खाकी वर्दीची आवड अन् आकर्षण होते. घरच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी मी इंजिनिअर झालो; पण (MPSC Success Story) त्या कक्षेत्रात माझे मन रमले नाही. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. वडील हयात नाहीत पण त्यांच्या पश्चात आईने केलेल्या प्रयत्नामुळे मी हे यश मिळवू शकलो. आमच्याकडे पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते. पण आईने मोलमुजरी करून आमचे शिक्षण पूर्ण केले. माझ्या यशात आईचा मोठा वाटा आहे;” असे वैभव सांगतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com