करिअरनामा ऑनलाईन | सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच (MPSC Success Story) आपलं करिअर करावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. अशाप्रकारे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर; “डान्सची प्रचंड आवड असल्याने मी छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची, परंतु वडिलांचा माझ्या डान्सला कडकडून विरोध होता;” असं सुरेखा यांनी सांगितलं.
घरातून विरोध, समाजाचा विरोध अशात सगळ्यावर मात करत लावणी कलावंत ते PSI झालेल्या सुरेखा कोरडे यांची ही कहाणी. महाराष्ट्राच्या लोककलेचा वैभव असणारी लावणी कला (MPSC Success Story) जरी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कितीही चांगल्या प्रकारे बघत असलो, तरी समाजाचा दृष्टिकोन मात्र त्याकडे बघण्याचा हा चांगला नाही. परंतु स्वतःच्या आवडीसाठी लावणी करणं, लावणीतून आई-वडिलांच्या स्वप्नासाठी अधिकारी होणं असा थक्क करणारा सुरेखा कोरडे यांचा जीवन प्रवास आहे.
प्रसंगी धुणी-भांडी केली (MPSC Success Story)
सुरेखा कोरडे यांचं सुरुवातीचं शिक्षण हे औंधमधील कस्तुरबा गांधी वसाहत इथे झालं. आई-वडिलांची परिस्थिती जेमतेम होती. वडील पीएमटी ड्रायव्हर होते. तर आई धुणी – भांड्याची काम करत. घरात पाच मुली, घरची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. त्यावेळेस सुरेखा कोरडे यादेखील आईसोबत कामाला (MPSC Success Story) जायच्या. आपल्या वडिलांचं पहाटे उठून जाणं हे त्यांना सतत कुठेतरी मनाला दुःख देत होतं आणि आपण यांना हातभार लावावा अशा विचारातूनच, त्यांनी लावणीकडे छंद म्हणून पहिलं आणि हा छंद जोपासताना घराला हातभार लावण्यासाठी थोडे पैसे मिळतील या दृष्टिकोनातून पाहिलं आणि स्टेजवर लावणी करायला सुरुवात केली.
असा सुरु झाला नृत्याचा प्रवास….
आपण नृत्याकडे कसे वळलो याची आठवण सांगताना सुरेखा कोरडे यांच्या डोळ्यासमोरून ते दिवस उभे राहतात. दहावीत असताना कराटेच्या स्पर्धेसाठी सुरेखा यांना काठमांडूला जायचं होतं. पण त्यासाठी 9 हजार रुपये फी भरायची होती. आता फी भरण्यासाठी तर पैसे नव्हते. मग त्यांना एका (MPSC Success Story) नृत्य स्पर्धेची जाहिरात कळाली. त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला, फक्त सहभागच नाही तर त्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. त्यावेळी 12 हजार रुपये बक्षीसाची रक्कम त्यांना मिळाली. याच रकमेतून त्यांनी काठमांडूच्या कराटे स्पर्धेत भाग घेतला आणि सिल्व्हर मेडल जिंकलं. आणि इथूनच सुरेखा कोरडे यांच्या नृत्याच्या करिअरला सुरवात झाली.
या अटीसाठी पदवी पूर्ण केली (MPSC Success Story)
घरी पाच बहिणी आणि आई-वडील. आर्थिक परिस्थिती बेताचीच. सुरेखा यांना नृत्य करण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी लावण्यखणी या लावणीच्या कार्यक्रमामध्ये लावणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु आई-वडील आणि समाज लोक कलेकडे वाईट नजरेने बघत होता. त्यामुळे वडिलांचा सुरुवातीला खूप विरोध होता. त्यानंतर घरूनच विरोध असल्यामुळे समाजातले लोक खूप काही बोलायचे. पण आवड म्हणून त्यांनी वडिलांना न सांगता लावण्यखणीचे अनेक शो केले. त्यानंतर एक दिवशी वडिलांनी त्यांना अट घातली, की जर तु पुढचं शिक्षण घेतलं, तर आम्ही तुला लावणी करायला परवानगी देतो. लावणीच्या आवडीसाठीच त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.
दिवसा लावणी अन् रात्री अभ्यास
पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेखा कोरडे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी लावण्यखणीचे प्रयोग सुरूच होते. त्याचबरोबर दिवसभर नृत्य आणि रात्री अभ्यास असा प्रवास सुरु होता. त्यांच्या लावणीच्या प्रमुखांनी सुरेखासाठी प्रवास करणाऱ्या त्यांच्या गाडीमध्ये अभ्यासाची खास सोय करून दिली होती.
अन् MPSC करायचं ठरवलं…
कलेचं क्षेत्र असं आहे की प्रत्येक कलाकाराला या क्षेत्रामध्ये चांगले वाईट अनुभव येत असतात आणि यातूनच हे मोठे कलाकार घडत असतात. परंतु काही ठिकाणी त्यांना थोडेसे वेगळे अनुभव आले. यातूनच त्यांनी निर्णय घेतला की आपण हे किती दिवस करणार, या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहेत. (MPSC Success Story) एका मर्यादेपलीकडे आपण लावणी कलाकार असो किंवा नसो, पण जर आपण MPSC केली तर अधिकारी पद शेवटपर्यंत आपल्या नावासोबत जोडलं जाईल. त्याचबरोबर आई-वडिलांना समाजामध्ये मान मिळावा, समाजाने त्यांना हिणवू नये, या उद्देशाने त्यांनी MPSC ची पूर्व परीक्षा दिली. 2010 साली MPSC च्या मुख्य परीक्षेसाठी त्यांनी 2 महिने पुण्याच्या सदाशिव पेठमध्ये राहून अभ्यास केला. या परिक्षेत त्या पासही झाल्या. त्यांची पहिली पोस्टिंग कळंबोली पोलीस स्टेशनला झाली. आज त्या गुन्हे अन्वेषण शाखेत एक यशस्वी अधिकारी म्हणून काम करत आहेत.
‘लवणीला मान द्या.. शिक्षण सोडू नका…’
लावणीमध्ये चांगलं करिअर चालू असताना त्यांना दोन पुरस्कार मिळाले. गदिमा आणि दुसरा राजश्री शाहू पुरस्कार मिळाला. परंतु आपल्या आवडीपेक्षा आपल्या आई-वडिलांचा मानसन्मान जास्त महत्त्वाचा आहे. या हेतूने त्यांनी पोलीस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्या अधिकारी झाल्या असल्या, तरी (MPSC Success Story) प्रत्येक कलाकाराचं दुःख त्यांनी बोलून दाखवलं. लावणीला नाव ठेवणं समाजाने बंद केलं पाहिजे. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ज्या मुली, जे कलाकार हे सगळं करून काही करण्याची इच्छा बाळगतात त्यांनी सुद्धा लावणीचे महत्त्व टिकवून ठेवावं. शिक्षण सोडू नका, शिकत राहा, मी जर नृत्य करताना शिकत राहिले नसते, तर आज इथे नसते, असं देखील सुरेखा कोरडे सांगतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com