MPSC Success Story: वडील अल्पभूधारक शेतकरी… मुलगी PSI; कोचिंग क्लास न लावता ठरली मुलींमध्ये अव्वल!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | लातूर जिल्ह्यातील औसा तालुका… या तालुक्यातील मासूर्डी हे छोटे गाव; या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. (MPSC Success Story) MPSC ने 2019 मध्ये 650 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 249 गुण मिळवत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात प्रतीक्षा पिंपरे या युवतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या गावातून एका शेतकऱ्याच्या मुलीने प्रचंड मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर मिळवलेले हे यश वाख्याण्याजोगे आहे. जाणून घेऊया प्रतिक्षाविषयी…

प्रतीक्षाचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण ….

सुरेश पिंपरे व शोभा पिंपरे हे मासूर्डी येथील अल्पभूधारक शेतकरी दांपत्य. त्यांना एक मुलगी व दोन मुले. त्यापैकी प्रतीक्षा ही सर्वात मोठी. प्रतीक्षा ही लहानपणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू मुलगी. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भादा येथे झाले. 12 वी पर्यंतचे शिक्षण औसा आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण हे लातूर येथील दयानंद महाविद्यालय व महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे झाले आहे. प्रतीक्षा हुशार असल्याने तीच्या काकांनी तिला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला दिला आणि प्रतिक्षाने त्या दिशेने वाटचाल सुरु केली.

महागडे कोचिंग क्लास न लावता स्वयंअध्ययनावर दिला भर – (MPSC Success Story)

प्रतिक्षाला MPSC ची परीक्षा द्यायची होती पण तिच्या आई- वडिलांना या बद्दल अधिक माहिती नव्हती. आपली मुलगी काही तरी करून दाखवणार हा विश्वास मात्र त्यांना होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी होकार दर्शवत तिला पुणे येथे जाण्याची परवानगी दिली. पुणे येथील वसतिगृहात राहून प्रतीक्षाने 2017 पासून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने तयारी सुरु केली. विशेष बाब म्हणजे कोणतेही महागडे क्लासेस न लावता तिने स्वयंअध्ययनावर भर दिला आणि परीक्षेची कसोटी तिने पार केली. ती फक्त परीक्षा पास झाली नाही; तर संपूर्ण राज्यातून तिने मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने परिस्थितीविषयी तक्रार न करता मिळवलेले यश म्हणजे अधिकारी होऊ पाहणाऱ्या युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे. प्रतीक्षाच यश पाहून तिचे वडील अभिमानाने म्हणतात; “लहानपणापासून प्रतीक्षा हुशार होती. तिला शिक्षणाची आवड होती. ती काहीतरी करून दाखवणार हा विश्वास होता आणि तिने करून दाखविले. खूप आनंद होत आहे आणि खूप अभिमान वाटतोय.
– सुरेश पिंपरे (प्रतिक्षाचे वडील)

 

…मेहनत व प्रामाणिक प्रयत्न आवश्यक –

“आई-वडिलांनी दाखविलेला विश्वास, शिक्षकांसह नातेवाईकांनी केलेले मार्गदर्शन आणि मित्र मैत्रिणींची साथ यामुळे मी हे यश संपादन करू शकले. यासाठी मेहनत व प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. (MPSC Success Story) ग्रामीण भागातून असल्याचा कमीपणा किंवा भीती न बाळगता जिद्दीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते.”
– प्रतीक्षा पिंपरे (PSI ) 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com