MPSC Success Story : सामान्य घडयाळ विक्रेता ते PSI… अशी आहे गौरवची यशोगाथा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ”भाऊ पोलिस दलात अधिकारी असल्याने (MPSC Success Story) पहिल्यापासूनच खाकीचे आकर्षण होते; त्यामुळे मलाही याच वाटेवर जायचे होते. माझ्या या यशात आई-वडील, गुरुजन, मोठा भाऊ गोकुळ, वहिनी प्रियांका यांचा मोलाचा वाटा आहे. मी कोणताही कोचिंग क्लास न लावता दिवसाला किमान 15 ते 16 तास अभ्यास करून जिद्द, चिकाटीने यश मिळवले आहे.” हे अभिमानाचे बोल आहेत पोलिस उपनिरीक्षक पदावर विराजमान झालेले तरुण अधिकारी गौरव वेताळ (PSI Gaurav Vetal) यांचे. त्यांचा एक सामान्य घडयाळ विक्रेता ते पोलिस उपनिरीक्षक हा प्रवास कसा होता ते जाणून घेवूया…

… तर यश आपल्या पायाशी लोटांगण घेते
गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण (MPSC Success Story) झाली आहे. उत्तम शिक्षण घेवूनही तरुणांना नोकऱ्या मिळणे हे दुरापास्त झाले आहे. परंतु परिस्थितीची जाणीव, सातत्यपूर्ण अभ्यास करण्याची मानसिकता, स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल तर यश आपल्या पायाशी लोटांगण घेते, याची प्रचिती गौरव वेताळ या तरुणाला आले आहे. ते मुल्हेर (ता. बागलाण) येथील रहिवासी आहेत. अगदी सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते आठवडी बाजारामध्ये घड्याळ विक्री, दुरुस्तीचे दुकान चालवत होते.

आठवडी बाजारात केले घडयाळ विक्री-दुरुस्तीचे काम
ग्रामीण भागात राहून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. ताहाराबाद येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी घेतली आहे. शिकत असताना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची परिपूर्ण जाणीव गौरव यांना होती. शिक्षणासोबत आपल्या (MPSC Success Story) परिवाराला आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्यासाठी त्यांनी वडिलांचा घड्याळ विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे सांभाळला. गौरव यांचे वडील शिवाजी वेताळ-चौधरी; त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. गौरवच्या आई छाया या गृहिणी आहेत. शेती व्यवसायसोबत घराला आर्थिक हातभार लावण्याच्या हेतूने गौरव यांनी आठवडे बाजारात घड्याळाचे दुकान सुरू केले होते.

आई-वडिलांची इच्छा झाली पूर्ण
आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, अशी लहानपणापासून त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. वेताळ कुटुंबाच्या संघर्षमय आयुष्याला त्यांचा मोठा मुलगा गोकुळ रेल्वे पोलिस दलात उपनिरीक्षक झाल्यानंतर दिलासा मिळाला. मोठ्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गौरव यांनी MPSC परीक्षा देण्यासाठी (MPSC Success Story) फॉर्म भरला. दुकान सांभाळत त्यांचा अभ्यास सुरू होता. त्यांनी कोणत्याही क्लासला प्रवेश न घेता केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर अभ्यास पूर्ण केला. त्यांनी इतर मागास प्रवर्गात संपूर्ण राज्यात चौथी रँक मिळवून आपले यश अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

दुसऱ्या प्रयत्नात मोठं यश मिळवलं
स्पर्धा परीक्षेत नशीब आजमावण्यासाठी त्यांनी (MPSC Success Story) नाशिक येथे राहून अभ्यास केला. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलं आहे. पहिल्यांदा २०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदाच्या पूर्व व मुख्य परीक्षेत त्यांनी यश मिळविले. परंतु शारीरिक चाचणी परीक्षेवेळी धावताना पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांची ही संधी हुकली. तरीही खचून न जाता त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा MPSCची परीक्षा देवून दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com