MPSC Success Story : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला कृषी अधिकारी; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली MPSC

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मनात जिद्द आणि मेहनत (MPSC Success Story) करायची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत या तरुणाने मनाशी पक्कं ठरवलं आणि अधिकारी होण्यासाठी त्याने MPSC च्या परीक्षेचा फॉर्म भरला. त्याचे प्रयत्न इतके प्रामाणिक होते की त्यामुळे तो परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात पास झाला आणि अधिकारी बनला.

पहिल्या प्रयत्नात बनला तालुका कृषी अधिकारी
बाभूळगाव (ता.येवला) येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली. आदेश नंदकुमार खाटीक असं या तरुणाचं नांव आहे. तो जगदंबा शिक्षण संस्थेच्या बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

 पालक आहेत सामान्य शेतकरी (MPSC Success Story)
त्याची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. आदेश हा मुळचा पाथरवाला (ता. नेवासा जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून त्याचे पालक शेती करतात. आदेशने कृषी महाविद्यालय, बाभूळगाव येथून कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या तो कृषी महाविद्यालय,पुणे येथे कृषी किटकशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. बाभूळगाव येथे शिक्षण घेत असतानाच पदवीच्या तिसऱ्या वर्षापासून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवेचा अभ्यास करत होता. पुणे येथे M. Sc. ॲग्रीची तयारी करतानाच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. यादरम्यान त्याने स्पर्धा परीक्षा देऊन त्याने MPSCमध्ये मोठं यश मिळवलं आहे.

आदेशच्या यशामुळे जगदंबा संस्थेच्या नावलौकिकात (MPSC Success Story) भर पडली आहे. आदेशच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, संचालक रूपेश दराडे, कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.व्ही.डी. शेंडे, प्राचार्य डॉ. डी.पी. कुळधर, उपप्राचार्य डॉ. एस. डी. म्हस्के व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com