MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली 274 पदांवर भरती; कोणत्या विभागात किती पदे?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । MPSC कधी भरती जाहीर करते; या बातमीची (MPSC Recruitment 2024) सगळेच तरुण उमेदवार आतुरतेने वाट पाहत असतात. या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या एकूण 274 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
पद संख्या – 274 पदे
पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) सामान्य प्रशासन विभाग, राज्य सेवा गट-अ व गट-ब – 205 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी घेतलेली असावी. (MPSC Recruitment 2024)
2) मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब – 26 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
3) महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब – 43 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
वय मर्यादा – (MPSC Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे
2. [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – ₹544/-
2. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – ₹344/-
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक –
1. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 -: दि. 28 एप्रिल 2024
2. राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 -: दि. 14 ते 16 डिसेंबर 2024
3. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 -: दि. 23 नोव्हेंबर 2024
4. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 -: दि. 28 ते 31 डिसेंबर 2024

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com