MPSC Recruitment 2023 : MPSCची मोठी अपडेट!! 8169 पदांच्या भरतीसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या सरकारी सेवेत दाखल होवू इच्छिणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढे उल्लेख केलेल्या संवर्गातील एकूण 8169 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 25 जानेवारी 2023 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता आयोगाकडून या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 असणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केला नसेल त्यांनी त्वरीत अर्ज करा.

संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पद संख्या – 8169

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)

  1. सहायक कक्ष अधिकारी:- 78 पदे
  2. राज्यकर निरीक्षक :-159 पदे
  3. पोलीस उपनिरीक्षक:- 374 पदे
  4. दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-49 पदे (MPSC Recruitment 2023)
  5. दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) :- 6 पदे
  6. तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) :- 1 पदे
  7. कर सहाय्यक, गट-क (वित्त) :- 468 पदे
  8. लिपिक-टंकलेखक :- 7034 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

कर सहाय्यक, गट-क (वित्त)
उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

उमेदवराकडे  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. कौशल्य असणे आवश्यक आहे.

लिपिक-टंकलेखक –

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. (MPSC Recruitment 2023)

उमेदवराकडे  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. कौशल्य असणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या तारखा –

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येतील.

  1. महाराष्ट्र अराजपत्रित गट व सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ – ०२ सप्टेंबर २०२३
  2. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३  – ०९ सप्टेंबर २०२३

महत्वाची सूचना –

1. पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे.
2. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
3. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा (MPSC Recruitment 2023) करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच समाजाच्या उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याबाबत (नॉन क्रीमीलेअर) (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.

4. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

आवश्यक शारीरिक क्षमता –

पुरुष –
उंची – १६५ सें मी (MPSC Recruitment 2023)
छाती न फुगविता : ७९ सें मी
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें मी

महिला – १५७ सें मी

वय मर्यादा – १ मे २०२३ रोजी

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी : ३१ वर्ष
इतर सर्व पदांसाठी : ३८ वर्ष
[मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी –
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/- (MPSC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 1

मुदतवाढ – PDF

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com