WhatsApp Group
Join Now
मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसेवेची पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी पूर्वनियोजित असलेली परिक्षा पुढे ढकलली आहे.#careernama #करिअरनामा #MPSC2020 #coronavirus pic.twitter.com/A3g4FOEVd9
— Careernama (@careernama_com) March 22, 2020
५ एप्रिल रोजी पूर्वनियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २६ एप्रिल रोजी घेण्यात येईल. तर कंबाईन परीक्षेसाठी ३ मे ऐवजी १० मे ही तारीख निर्धारित करण्यात आली आहे. आयोगाने अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.