MPSC Exam : राज्यसेवा मुख्य अन् पूर्व परिक्षेच्या तारखा जाहीर; पहा वेळापत्रक

MPSC Exam Date 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकही जाहीरात प्रसिद्ध केली नव्हती. पण, अखेर राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2021 ची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर सोमवारी बहुप्रतिक्षित अशा राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या(MPSC Exam) तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आयोगामार्फत आता 290 पदांसाठी 17 संवर्गात भरती केली जाणार आहे.

या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विटद्वारे देखील माहिती दिली असून, त्यानुसार 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसे, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

याचबरोबर मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना 5 ऑक्टोबरपासून अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.