अखेर प्रतीक्षा संपली ! MPSC परीक्षेच्या नव्या तारखा झाल्या जाहीर; 14 मार्च रोजी होणार पूर्वपरीक्षा

MPSC Exam Date 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, १४ मार्च २०२१), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० (शनिवार, २७ मार्च २०२१) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (रविवार, ११ एप्रिल २०२१) रोजी होणार आहे.या अगोदर निश्चित करण्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० (११ ऑक्टोबर २०२०), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -२०२० – (१ नोव्हेंबर २०२०) व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० (२२ नोव्हेंबर २०२०) होणार होती.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२० मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे दिनांक संदर्भिय दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकाद्वारे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. तथापि, ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत शासानाकडून ऐनवेळी निर्णय घेण्यात आला व तसे आयोगास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्राकद्वारे तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयोगाकडून घोषित करण्यात आले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com