MPSC Exam 2022 : तयारीला लागा… MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर!! 1085 जणांना अधिकारी होण्याची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (MPSC Exam 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती –

राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector Group-B)

पोलीस उप निरीक्षक गट-ब (Police Sub-Inspector Group-B)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPSC Exam 2022)

इच्छुक उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

या केंद्रांवर होईल परीक्षा –

अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 544/- रुपये

मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील – 344/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

  1. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  4. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  5. पासपोर्ट साईझ फोटो (MPSC Exam 2022)

अधिक माहितीसाठी येथे CLICK करा

अधिकृत वेबसाईट – https://mpsconline.gov.in/candidate

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com