MPSC Engineering Services : MPSC अंतर्गत इंजिनियर्ससाठी भरती सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (MPSC Engineering Services) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता (यांत्रिकी) पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरले जाणारे पद – उप अभियंता (यांत्रिकी) (Deputy Engineer,Mechanical)

पद संख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज फी –

मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग – रु. 449/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MPSC Engineering Services)

  • उप अभियंता (यांत्रिकी) –

Possess a degree in mechanical engineering of a statutory University or any recognized Institution or any other qualification equivalent
Salary Details For MPSC Engineering Services Examination 2022

मिळणारे वेतन –

उप अभियंता (यांत्रिकी) Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
  2. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
  5. अर्ज 18 नोव्हेंबर पासून सुरु होतील. (MPSC Engineering Services)
  6. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  7. अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2022 आहे.
  9. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया –

  • प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
  • जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा नुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. (MPSC Engineering Services)
  • चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
  • चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
  • चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
  • मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com