करिअरनामा ऑनलाईन। शिक्षणाचा वयाशी काहीही संबंध नाही. एखादी गोष्ट करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती (Motivational Story) असेल तर माणूस सर्व संकटांवर मात करून आपले ध्येय गाठू शकतो. अशी कामगिरी काश्मीरमधील एका महिलेने करून दाखवली आहे. या महिलेलने लग्नानंतर दहा वर्षांनी अभ्यास सुरू केला आणि दहावीत तब्बल 93.4% गुण मिळवले. या हुशार महिलेचं नाव आहे सबरीना खालिक.
तुमचं वय आणि परिस्थिती काहीही असू देत जर तुमच्यात जिद्द असेल तर सर्वकाही यशात बदलण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते. कधी कधी अनेक व्यक्ती वाईट परिस्थितीलाआपल्या जिद्दीसमोर झुकण्यास भाग पाडते. त्यात जर ती व्यक्ती आई असेल तर तिच्यातील जिद्द दुपटीनं वाढते. अशीच एक आई आहे जिनं तीन मुलांचा सांभाळ करून दहावीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये भरघोस यश मिळवलं आहे.
जबाबदऱ्या सांभाळत केला अभ्यास (Motivational Story)
या आईचं नाव आहे सबरीना खालिक. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील ही महिला 3 मुलांची आई आहे. ती घरात अनेक जबाबदाऱ्या अगदी लीलया पार पडते. इतक्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सबरीना खालिकचे अभ्यासाशी असलेले नाते तुटले नाही. घरची परस्थिती बिकट असूनही तिनं जिद्दीनं दहावीची परीक्षा पास करून दाखवली आहे.
घरातील सर्व काम करूनही तिने अभ्यास सुरू ठेवला आणि दहावीला प्रवेशही घेतला. तीन मुलांचा सांभाळ करत तिचा अभ्यास सुरु होता. जेव्हा परीक्षेच्या निकालाचा दिवस उजाडला तेव्हा घरच्या मंडळींना आनंदाचा धक्का बसला. सबरीना खालिकने 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 93.4% गुण मिळवले होते. हा निकाल पाहून तिच्यासह कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
10 वर्षांच्या गॅप नंतर अभ्यासाचा ‘श्री गणेशा’
सबरीना खालिकचे 2012 मध्ये लग्न झाले आणि त्यानंतर तिने आपले शिक्षण सोडले. 10 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. आता तिने केवळ 10वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर या परीक्षेत तिने 500 पैकी 467 गुण मिळवून काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक गुण मिळवणारी विद्यार्थिनी ठरली आहे. तिने इंग्रजी, उर्दू, विज्ञान (Motivational Story) आणि सामाजिक शास्त्रात ए-१ ग्रेड मिळवली आहे. तिच्या या कामगिरीने अनेक महिलांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण झाली आहे.
‘हे अजिबात सोपे नव्हते..’
सबरीना खालिकने सांगितले की, “2012 मध्ये 9 वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी तिचे लग्न झाले आणि ती घरातील कामात व्यस्त झाली. तीन मुलांच्या जबाबदाऱ्या तिच्या अभ्यासाला मागे ढकलत होत्या. पण सबरीनाने हार मानली नाही, मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत तिने आपला अभ्यास सुरू ठेवला. जे अजिबात सोपे नव्हते. कारण त्यांची तिन्ही मुले अल्पवयीन आहेत. सबरीना तीन मुलांची आई आहे. मोठी मुलगी आठ वर्षांची आणि धाकटी मुलगी सहा वर्षांची आहे; तर सर्वात धाकटा मुलगा अजून कडेवर असतो.
ती पुढे म्हणते; “या वर्षी 10 वीच्या परीक्षेला बसण्याचे मी मनाशी पक्के ठरवले होते. सुरवातीचा काळ माझ्यासाठी कठीण होता, पण काळाच्या ओघात मला सर्व गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजू लागल्या.”
पतीला वाटतो अभिमान
“मला सबरीनाचा अभिमान आहे,” असे तिचे पती सज्जाद अहमद दार यांनी सांगितले. ते म्हणतात, “आमचं लहान वयात लग्न झालं होतं. माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तिने तिच्या आयुष्यातील 10 सर्वोत्तम वर्षे दिली आहेत. तिच्या अभ्यासात खंड पडतोय याचं मला बर्याचदा वाईट वाटायचं, पण आता आनंद वाटतोय सबरीनाचे हे यश पाहून गावातील इतर महिलाही तिचे कौतुक करत आहेत.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com