करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहित आहे का जगातील (Most Educated Man) सर्वात शिक्षित व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती अमेरिका, ब्रिटन आणि युरोपसारख्या देशांतील नाही, जिथे जगातील सर्वोत्तम विद्यापीठे आहेत. उलट ही व्यक्ती आफ्रिकन देश सिएरा लिओनची आहे. डॉ.अब्दुल करीम बांगुरा यांना जगातील सर्वात शिक्षित व्यक्ती मानलं जातं. डॉ. अब्दुल करीम बांगुरा हे लेखक, शैक्षणिक प्रशासक, संशोधक आणि शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एकूण पाच विषयात PHD केली आहे.
वडिलांकडून मिळाली लिखानाची प्रेरणा
डॉ. अब्दुल करीम बांगुरा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1953 रोजी सिएरा लिओनच्या बो प्रांतात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अली कुंदा बांगुरा होते, ते उत्तर सिएरा लिओनमधील पोर्ट लोको शहरातील बांगुरा प्रमुखांचे वंशज होते. अब्दुल करीमचे वडील व्यवसायाने अभियंता होते. एका मुलाखतीत त्यांनी (Most Educated Man) सांगितले होते की, त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव आहे. ते म्हणाले होते की माझ्या दिवंगत वडिलांनी मला लिहिण्यासाठी खूप प्रेरणा दिली. त्यांनी मला नेहमीच अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं. तसेच मला सांगितलं की एखाद्याने नेहमीच अत्याचारित, छळलेल्या लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे.
कोण कोणत्या विषयात घेतली PHD
अब्दुल करीम यांनी घेतलेल्या पीएचडी पदवीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी राज्यशास्त्रात पीएचडी, विकास अर्थशास्त्रात पीएचडी, भाषाशास्त्रात पीएचडी, संगणकशास्त्रात पीएचडी (Most Educated Man) आणि गणितात पीएचडी केली आहे. याशिवाय इंटरनॅशनल स्टडीजमध्ये बीए, इंटरनॅशनल अफेअर्समध्ये एमए आणि भाषाशास्त्रात एमएस अशी पदवीही घेतली आहे.
अब्दुल यांना इतक्या भाषा येतात (Most Educated Man)
डॉ. अब्दुल करीम यांनी 35 पुस्तके आणि 250 अभ्यासपूर्ण लेख लिहिले किंवा संपादित केले आहेत. ते एकूण 18 भाषा बोलू शकतात. यामध्ये इंग्रजी, टेम्ने, मेंडे, कारियो, फुला, कोनो, लिंबा, शेर्बो, स्वाहिली, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच, अरबी, हिब्रू, जर्मन आणि स्वीडिश यांचा समावेश आहे. (Most Educated Man)
अब्दुल करीम यांनी आपले प्रारंभिक शिक्षण सिएरा लिओनची राजधानी फ्रीटाउन इंडिपेंडन्स प्रायमरी अँड सेकंडरी स्कूलमध्ये केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. पुढे त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्वही घेतले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com