सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । सैनिकी शाळेत प्रवेश घ्यावा असं स्वप्न बाळगणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शैक्षणिक सत्र २०२१ साठी देशातील एकूण ३३ सैनिकी शाळांमधील प्रवेशासाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेची घोषणादेखील झाली आहे. सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर aissee.nta.nic.in येथे यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी झाले आहे.

सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी मध्ये प्रवेश होतील. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी आणि नववी प्रवेशांसाठी देशभरात ही प्रवेश परीक्षा (AISSEE 2021) १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाईल.सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. एआयएसएसईई चे संकेतस्थळ aissee.nta.nic.in द्वारे अर्ज करायचा आहे.

Military Schools Admission 2021-22 Application Form

वयाची अट – 

इयत्ता सहावीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १० ते १२ वर्षादरम्यान असावे. मुलींसाठी सर्व सैनिकी शाळांमध्ये केवळ इयत्ता सहावीतील प्रवेशाचा नियम आहे.

इयत्ता नववीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १३ ते १५ वर्षांदरम्यान असावे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण असायला हवे.

शुल्क – खुला वर्ग – ५०० रुपये , SC /ST – ४०० रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन. Military Schools Admission 2021-22 Application Form

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ नोव्हेंबर २०२०

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://aissee.nta.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: