MHT CET Results : कधी जाहीर होणार MHT CETचा निकाल? जाणून घ्या

MHT CET Results
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश (MHT CET Results) परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) इंजिनीअरिंग, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल दि. 12 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. सीईटी सेलमार्फत ही महिती देण्यात आली असून, कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.
या निकालानंतर इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असून, प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. सीईटीचा निकाल लागण्यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘कॅप’ प्रक्रियेसाठी नोंदणी सुरु केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलमार्फत देण्यात आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यभरात सीईटी परीक्षांचे आयोजन केले होते. पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. 25 मार्चला (MHT CET Results) एमबीए अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेपासून यावर्षीच्या सीईटी परीक्षांना सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थी संख्येच्‍या आधारावर एक किंवा एकापेक्षा जास्त दिवसांकरिता अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षा पार पडल्या आहेत.
सध्या बहुतांश अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा झालेल्या असून, आता पुढील टप्प्यात निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील पदवी (बी. एचएमसीटी), आणि पदव्युत्तर पदवी (एम. एचएमसीटी) सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यासोबत बीए / बीएस्सी. बी. एड. (इंटिग्रेटेड), बी. प्लॅनिंग, एम.आर्क., फाइन आर्ट (एएसी-सीईटी), एम. पीएड., एमसीए, विधी (MHT CET Results) शाखेतील 5 वर्षे व 3 वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांची एलएलबी सीईटी, बी. डिझाइन सीईटी या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.
सद्यस्थितीत बहुतांश अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा झालेल्या असून, आता पुढील टप्प्यात निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com