MHT CET 2024 : MHT CET चा निकाल आज सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार; असा पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT CET 2024) महत्वाची घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेची निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल आज रविवार दि. 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट https://cetcell.mahacet.org/ वर निकाल पाहता येणार आहे.

एमएचटी सीईटीद्वारे दि. 22 एप्रिल ते दि. 16 मे या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तेव्हापासून निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. या निकालावर (MHT CET 2024) शिक्षणाची पुढील दिशा ठरवली जाते. दरम्यानच्या काळात सीईटी सेलने (CET Cell) निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सीईटी सेलने निकालाबाबत प्रसिद्धीपत्रकातून माहिती दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.

MHT CET 2024 निकाल असा पहा – (MHT CET 2024)
1. सर्वप्रथम निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या cetcell.mahacet.org अधिकृत संकेस्थळाला भेट द्या .
2. त्यानंतर Check MHT CET Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
3. रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा आणि विचारलेला तपशील प्रविष्ट करा.
4. स्क्रीनवर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.
5. रिजल्ट चेक केल्यानंतर डाऊनलोड करा आणि निकालाची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com