करिअरनामा ऑनलाईन | विधी शाखेतील (MH CET LAW) वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लॉ मध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लॉ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्माण होताना दिसत आहेत. Directorate of Technical Education (DTE), Maharashtra यांच्याकडून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व विधी महाविद्यालयांकरता Entrance Exam घेतली जाते. या वर्षीसाठी MH CET LAW 2022 Application Form भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुकांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
5 Year LLB प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया सुरु – २० मार्च २०२२
अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस – २७ एप्रिल (मुदतवाढ)
3 Year LLB प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया सुरु – २४ मार्च २०२२
अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस – २५ एप्रिल (मुदतवाढ)
LAW शाखेचीच निवड का म्हणुन ?
12 वी ची परिक्षा पास झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आता पुढे काय करायचे हा प्रश्न सर्वांनाच सतावत असतो. पुर्वी 12 वी झाल्यानंतर अभियात्रिकी शाखेला प्रवेश घेण्याचा ट्रेंड तयार झाला होता. परंतु आता इंजिनिअरिंगसारख्या तात्रिकी शिक्षणाला म्हणावा तसा वाव राहिलेला नाही. तसेच विज्ञान, वाणिज्य, कला यांसारख्या शाखांमधून चांगल्या गुणांनी पदवी घेतलेले अनेक युवक सुद्धा बेरोजगारीचा सामना करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमधे लाॅ हे क्षेत्र तरुणांना आश्वासक वाटत आहे.
शिवाय वकिलीचे शिक्षण कधीच वाया जात नाही; ते आज ना उद्या आपल्या कामाला येतेच असेही बोलले जाते, त्यामुळे तरुण वर्ग लाॅकडे आकर्षीत होत आहे. विशेषत: UPSC – MPSC अशा स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी लाॅ एक पर्वणीच ठरत आहे. स्पर्धा परिक्षांमधून येणार्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी लाॅ चे शिक्षण स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्याना मदत करत आहे.
आज बरेच विद्यार्थी स्वत:ची नोकरी वा इतर अभ्यास सांभाळून लाॅ ला प्रवेश घेताना दिसत आहेत. तेव्हा, जर तुम्ही १२ वी पास असाल कींवा तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असेल आणि आता वकिल होण्याचे स्वप्न पाहत असाल, लाॅ शाखेला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर मग तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात असे समजण्यास हरकत नाही.
LLB मधिल करिअरच्या संधी
लाॅ शाखेची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. सर्वप्रथम लाॅ पुर्ण झाल्यानंतर कोणत्याही न्यायालयामधे वकिली सुरु करता येते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय ते अगदी स्थानिक न्यायालयांमधे वकीली करण्यास तुम्ही पात्र होता. याशिवाय सरकारी क्षेत्रातील अनेक पदांकरिता घेण्यात येणार्या परिक्षांसाठी तुम्ही पात्र होता. यामधे न्यायाधीशांपासून सरकारी वकील इत्यादी पदे येतात.
तसेच याव्यतिरिक्त अनेक कंपन्यामधे लीगल अॅडव्हायजर या पदाच्या अनेक जागा रिक्त असतात. काॅर्पोरेट क्षेत्रातसुद्धा नोकरीच्या अनेक संधी आहेत. महिलांकरीता लाॅ नंतर संरक्षण खात्यातसुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. विविध लाॅ फर्म्स मधेही तुम्ही रुजू होऊन चांगला पगार मिळवू शकता. जर तुमच्यामधे पॅशन असेल आणि जिद्द व चिकाटीने काम करण्याची तयारी असेल तर या क्षेत्रामधे संधींना अंत नाही असे म्हणण्यास हरकत नाही. MH CET LAW 2022
MH CET Law प्रवेश परिक्षा
विधी शाखेला प्रवेश घेण्यासाठी नेशनल इन्स्टिट्युट आॅफ लाॅ करीता CLAT ही परिक्षा द्यावी लागते तर महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता MHT – CET Law ही प्रवेश परिक्षा द्यावी लागते. पुर्वी पदवीच्या गुणांवरुन लाॅ शाखला प्रेवश मिळत असे परंतू 2016 पासून शासनाने लाॅ प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा घेणे सुरु केले आहे. MH CET LAW 2022
बीए.एल.एल.बी. आणि एल.एल.बी –
१२ वी नंतर विधी शाखेला प्रवेश घेणार्यांसाठी BALLB हा कोर्स असतो तर कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करणार्यांसाठी LLB हा कोर्स असतो. BALLB या कोर्स चा कालावधी 5 वर्षांचा असतो तर LLB चा कालावधी ३ वर्षांचा असतो. या दोन्ही कोर्सेस करिता दरवर्षी सी.ई.टी. प्रवेश परिक्षा घ्याण्यात येते. हजारो विद्यार्थी या परिक्षेला बसतात. त्यातील साधारणत: 15000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. LLB CET 2022
प्रवेश परिक्षेचे स्वरुप व अभ्यासक्रम –
विधी शाखेची प्रवेश परिक्षा १५० गुणांची व बहुपर्यायी स्वरुपाची असते. इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि लिगल अॅप्टीट्युड हे विषय परिक्षेसाठी असतात. या परिक्षेमधे निगेटीव्ह मार्कींग पद्धत वापरली जात नाही. ही परिक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येते. MH CET LAW 2022 परिक्षासाठी २ तास वेळ देण्यात येतो तसेच ही प्रवेश परिक्षा मराठी किंवा इंग्रजी अशा कोणत्याही माध्यमातून देता येते. सन 2022 साली होणारी प्रवेश परिक्षा आजवरची पाचवी प्रवेश परिक्षा असल्याने बाजारात म्हणावे त्या दर्जाची पुस्तके अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्यातून अभ्यास करावा. LLB CET 2022
प्रवेश प्रक्रीया MH CET LAW 2022
प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काहीच काळात लाॅ साठीची प्रवेश प्रक्रीया चालू होते. सी.ई.टी. च्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. संपुर्ण प्रवेश प्रक्रीया आॅनलाईन पद्धतीने होते. प्रवेशाच्या साधरणत: ૪ ते ५ फेर्या होतात. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या फेर्या सुरु होण्यापूर्वी महाविद्यालयांची पसंती यादी जमा करण्यास सांगण्यात येते. पसंती याद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालये दिली जातात. LLB CET 2022
अर्ज कसा भराल, अर्ज भरण्याची शेवटची तारिख (MH CET Law Application Form) –
इच्छुक विद्यार्थी https://info.mahacet.org या वेबसाईटवर अर्ज भरु शकतात. एल.एल.बी. साठीच्या सी.ई.टी. परिक्षेचे अर्ज २४ मार्च पासून उपलब्ध झाले असून २५ एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १२ वी नंतर देता येणारी बी.ए. एल.एल.बी. साठीच्या प्रवेश परिक्षेसाठीची अर्ज भरण्याची मुदत २७ एप्रिलपर्यंत आहे. MH CET LAW
MAH LLB 3 Year CET – APPLY NOW
MAH LLB 5 Year CET – APPLY NOW
अधिक माहितीसाठी पहा – Click Here (www.careernama.com)
The fee for MH CET Law 2022 application form will be as follows:
Category | Application Fee |
For general category | Rs. 800/- |
For reserved category | Rs. 400/- |
MH CET Law 2022 Events | 5-year LLB Course Dates | 3-year LLB Course Dates |
---|---|---|
MH CET Law 2022 Registration Begins | March 19, 2022 | March 24, 2022 |
MH CET Law 2022 Registration End | April 27, 2022 | April 25, 2022 |
MH CET Law 2022 Admit Card Releases | May 24, 2022 | May 18, 2022 |
MH CET Law 2022 Exam Date | June 10, 2022 | June 4- June 5, 2022 |
ही महाविद्यालये लाॅसाठी प्रतिष्ठीत
पुण्यामधील आय.एल.एस. महाविद्यालय लाॅ साठी प्रतिस्ठीत मानले जाते. देशातील टाॅपच्या पहील्या पाच महाविद्यालयांमधे या विद्यालयाचा समावेश होतो. त्यानंतर मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाचा (जी.एल.सी.) नंबर लागतो. याचबरोबर के.सी. लाॅ काॅलेज (मुंबई), नवलमल फिरोदिया लाॅ काॅलेज (पुणे), सिद्धार्थ लाॅ(मुंबई) इत्यादी महाविद्यायेही प्रतिष्ठीत मानली जातात. LLB CET 2020 MH CET LAW 2020
तर मित्रांनो, विधी शाखेला प्रवेश घेण्याचा तुमचा निर्णय पक्का असेल तर आता प्रवेश परिक्षेच्या तयारीला लागा. लाॅ ची पदवी घेतल्यानंतर तुमचे भविष्य उज्वल आहे यात शंका नाही. तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com
नोकऱ्यांबाबत अधिक माहितीसाठी खालील अपडेट पहा –
10 पास आहात अन् नोकरी शोधताय? जाणुन घ्या 1300 हून अधिक भरती प्रक्रियांबाबत
8वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी ! महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत भरती