10 पास आहात अन् नोकरी शोधताय? जाणुन घ्या 1300 हून अधिक भरती प्रक्रियांबाबत

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतामधील या आठवड्यात निघालेल्या महत्वाच्या सरकारी नोकऱ्या बद्दल माहिती सांगणार आहोत .त्यामध्ये कोणत्या विभागात जागा निघाल्या ? त्याची शेवटची तारीख काय असणार ? शैक्षणिक पात्रता काय असणार ? अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती खाली दिलेली आहे.

BRO Recruitment 2022 – BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये 302 पदासाठी भरती आहे.09 एप्रिल 2022 पासून या भरतीला सुरूवात झाली आहे. भरती मल्टि स्किल वर्कर पदासाठी आहे. या भरतीसाठी 10वी & 12वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची लिंक – click here

Bank of Baroda Recruitment 2022 –

बँक ऑफ बडोदा मध्ये 50 आणि 47 अशा दोन भर्ती निघाल्या आहेत.ही भर्ती कॅश मॅनेजमेंट डिपार्टमेंट मध्ये निघाली आहे.कोणत्याही शाखेतील पदवीधर या भर्तीसाठी अर्ज करू शकतो.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.अर्ज करण्याची लिंकclick here

AIASL Recruitment 2022 –

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये एकूण 604 पदासाठी भरती निघाली आहे.या भरतीसाठी 10वी पास,ITI ,इंजिनिअरिंग डिप्लोमा & पदवी तसेच पदवीधर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल आहे.अधिक माहितीसाठी ही जाहिरात पहा – pdf

हे पण वाचा -
1 of 18

Shivajirao pawar pharmacy college Recruitment 2022 –

शिवाजीराव पवार फार्मसी कॉलेज मध्ये 182 पदासाठी भरती निघाली आहे. ही भरती प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहायक, कार्यालय अधीक्षक, लिपिक, स्टोअर इन्चार्ज, रेक्टर, बस चालक, शिपाई, माळी, वॉचमन, उपप्राचार्य, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, सीएनसी ऑपरेटर, फिटर, टर्नर, सुतार या पदासाठी होणार आहे.10वी,पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन ई-मेल द्वारे करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.अर्ज या ई-मेल वरती पाठवायचे आहेत- [email protected]

ESIC Recruitment 2022 –

कर्मचारी राज्य विमा महामंडळा अंतर्गत 218 पदासाठी भरती निघाली आहे.ही भरती वैद्यकीय महाविद्यालया मध्ये असोसिएट प्रोफेसर पदासाठी आहे.आरोग्य क्षेत्रात पदवी & पदव्युत्तर पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2022 आहे.अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा –pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com