करिअरनामा ऑनलाईन। वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदीतून देण्याचा मध्य प्रदेश सरकारचा (Medical Education) निर्णय ताजा असताना आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोप्प होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध असेल.
MBBSसह या शाखांचा अभ्यास मराठीतून
या निर्णयामुळे आता MBBSसह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल.
“मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात राज्य भाषेत म्हणजेच मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वच पॅथी, एमबीबीएस पर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीत (Medical Education) देण्याचा आमचा प्रयत्न आहे;” असं महाजन यांनी यावेळी सांगितलं आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर व्हावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे;” असंही महाजन म्हणाले आहेत.
विद्यार्थ्यांना हवी ती भाषा निवडता येणार (Medical Education)
राज्य सरकारकडून नव्या शैक्षणिक वर्षापासून मराठी वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग काहीसा सोपा होणार आहे. पण वैद्यकीय शिक्षण मराठीत घेणे बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, हवी ती भाषा निवडण्याची मुभा असेल.
वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य
भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्यासाठी (Medical Education) मध्य प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे.
राज्यातील सध्याची परिस्थिती
राज्यात सध्याच्या परिस्थितीला एमबीबीएसचे शिक्षण देणारी 62 महाविद्यालये आहेत. त्यात 10,045 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची 27, खासगी 20, अभिमत विद्यापीठ 12 तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तीन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार
विशेष म्हणजे इंग्रजीतील पुस्तकांचे भाषांतर करताना कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येणार नाही. केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी तीन स्तरावरील वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये समिती याची पाहणी आणि मांडणी करणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com