MCA Admission 2024-25 : MCA अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; इथे आहे अर्जाची लिंक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MCA Admission 2024-25) कक्षातर्फे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन (Master of Computer Applications) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीईटी-सेलने (CET Cell) याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत घोषणा केली आहे; त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज करता येणार
सीईटी सेलने प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार (MCA Admission 2024-25) विद्यार्थ्यांना 6 जुलै ते 14 जुलै या कालावधीत प्रवेश अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी 7 ते 15 जुलै या कालावधीत अर्जात दुरूस्ती करू शकतात. विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी दि. 17 जुलै रोजी प्रसिध्द केली जाणार असून विद्यार्थ्यांना दि. 18 ते 20 जुलै या कालावधीत त्यावरील आक्षेप नोंदवता येतील. विद्यार्थ्यांची अंतीम गुणवत्ता यादी दि. 22 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.

असा करा अर्ज (MCA Admission 2024-25) –
इच्छुक आणि पात्र विद्यार्थी सीईटी-सेलच्या https://mca2024.mahacet.org.in/cet2024/mca24/ या लिंकवर जाऊन एमसीए (MCA) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. सीईटी-सेलने या लिंकवर प्रवेशाबाबतची सर्व माहिती प्रसिध्द केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com