MBA Admission 2023 : MBA प्रवेशासाठी मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या (MBA Admission 2023) प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे 37 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी करण्यास दि. 14 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापन असणाऱ्या संस्था, विद्यापीठांमधील विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था यांसह विविध शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये MBA या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत 37 हजार 59 हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर 12 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत.

MBA अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 14 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश फेऱ्यांचा तपशील लवकरच जाहीर करणार (MBA Admission 2023) असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक –
ऑनलाइन नोंदणी, प्रवेशास आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे : दि. 14 जुलै 2023
कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन अर्ज निश्चित करणे – दि. 15 जुलै 2023
विद्यार्थी-पालकांसाठी सूचना – (MBA Admission 2023)
1. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ‘ई-स्क्रुटनी’ची सोय उपलब्ध
2. प्रत्यक्ष जाऊन पडताळणीसाठी पडताळणी केंद्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3. कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया शनिवारी आणि रविवारी देखील खुली असेल.
अधिक माहितीसाठी वेबसाईट – www.mahacet.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com