आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना महावितरणात मिळणार संधी

करिअरनामा । आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या महावितरणात संधी मिळणार आहे.  महावितरणाने जवळपास वर्षभरानंतर या श्रेणीतील भरतीसाठी जाहिरात काढली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ही भरती प्रारंभी अप्रेन्टिस श्रेणीसाठी होणार आहे. तरी १० पास असणाऱ्या आणि या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज महाराष्ट्र राज्य महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जावून भरता येतील. हे अर्ज करण्याची तारीख मात्र अजून निश्चित करण्यात आली नाही.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदे – ४८

पदाचे नाव – लाइनमन, इलेक्ट्रिशियन, संगणक आणि प्रोग्रामिंग सहाय्यक

शैक्षणिक पात्रता –

१) लाइनमन – आयटीआयचा वायरमन अभ्यासक्रम

२) इलेक्ट्रिशियन- आयटीआय इलेक्ट्रिशियन

३) संगणक श्रेणी- आयटीआय कोपा (COPA) हा अभ्यासक्रम पूर्ण

अर्ज करण्याची तारीख – निश्चित नाही

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स  थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.