महाराष्ट्र वनसेवक 12991 पदांची मेगा भरती; A टू Z माहिती Maharashtra Van Sevak Bharti 2025

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र शासनाच्या वनविभागा अंतर्गत वनसेवक Maharashtra Van Sevak Bharti 2025 पदाची तब्बल 12,991 जागांची भरती लवकरच होणार आहे. वनविभागाने भरतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून लवकरच या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. वनसेवक या पदासाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून किमान पात्रता 10 वी पास ठेवण्यात आली आहे. वनसेवक हे पद महाराष्ट्र सरकारच्या गट ड या श्रेणीत येत असून सातव्या वेतन आयोगानुसार निवडण्यात आलेल्या वन सेवकांना आकर्षक वेतनही देण्यात येणार आहे. स्थानिक उमेदवारांच्या हाताला नोकरी मिळण्याच्या उद्देशाने वनविभागाची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी मेगा भरती म्हणावी लागेल. भरतीची संपूर्ण प्रक्रिया, पदोन्नती आणि अटी जाणून घेण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचून घ्या.

वनविभागाने या मेगाभरतीसाठी काही महत्वाचे मार्गदर्शक तत्वे आणि अटी लागू केलेल्या आहेत. ते पुढीलप्रमाणे असतील.
1) स्थानिक उमेदवारांची नियुक्ती
नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
स्थानिक म्हणजे ज्या वनविभागात (Division) नियुक्ती होणार आहे, त्या विभागातील रहिवासी उमेदवार.

2) पदाची श्रेणी आणि वेतन Maharashtra Van Sevak Bharti 2025 –
हे पद गट-ड श्रेणीत येईल.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस-१ (₹१५,०००-४७,६००) असेल.
पदाचे पदनाम वनसेवक असेल.

3) शैक्षणिक पात्रता
किमान शैक्षणिक पात्रता १० वी पास असावी.
कमाल शैक्षणिक पात्रता १२ वी पास ठेवण्यात येईल.
जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल.

4) रोजंदारी मजुरांसाठी विशेष अट
सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत ५५ वर्षांपर्यंत सूटसह १०% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान १८० दिवस तुटक स्वरूपात ५ वर्षे काम केलेले असणे आवश्यक.
रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही.

5) पदोन्नतीचे संधी – Maharashtra Van Sevak Bharti 2025
वनरक्षक (गट-क) पदांमध्ये २५% पदे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक कराhttps://mahaforest.gov.in/index.php/Gr/index/