करिअरनामा ऑनलाईन । पुढील वर्षी 2024 मध्ये (Maharashtra State Board Exams Schedule) होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, तर दहावी बोर्डाच्या परीक्षा दि. 1 मार्च पासून सुरु होतील.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 12 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), अमरावती, कोल्हापूर लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत 10वी आणि 12वीच्या बोर्ड (SSC HSC Exams) परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना परीक्षांचे वेळापत्रक माहिती असेल तर (Maharashtra State Board Exams Schedule) अभ्यासाची तयारी करण्याचे नियोजन करता येतात. त्यामुळेच पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.
बोर्ड 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा घेते. पुढील वर्षी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील बोर्डाने सांगितली आहे. 12वीसाठी (HSC) सुमारे 14 लाख विद्यार्थी बसू शकतात आणि 10वीसाठी (SSC) बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 लाख आहे. पुरवणी परीक्षेसाठी सुमारे दहावी आणि बारावी मिळून 6 लाख विद्यार्थी अपेक्षित असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. राज्यात सुमारे 21,000 शाळा (SSC) आणि 7000 माध्यमिक, ज्युनियर महाविद्यालये (HSC) विद्यार्थी आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com