MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत विविध विभागातील 15000 जागा लवकरच भरण्यात येणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागातील सन 2018 पासून भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 रखडलेले पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती प्रक्रीया गतिमान करत असल्याचे सांगितले, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलैपर्यंत भरण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मंगळवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात अजित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल जलद गतीने कशा पद्धतीने लागतील या बाबतीत राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

ज्या विभागांची रिक्त जागा भरणे अतिआवश्यक आहे अशा विभागांना रिक्त जागा भरण्याची परवाणगी वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे आता सन 2018 पासून रखडलेल्या जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रिया पूर्ण करत असताना आरक्षण तपासून योग्य त्या पद्धतीने करण्यात यावी,असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

MPSC मार्फत भरली जाणारी रिक्त जागा –
अ गट – 4,417
ब गट – 8,031
क गट – 3063

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.