Maharashtra News : विद्यार्थ्यांना बाप्पा पावला!! गणेशोत्सवात काळात शाळेच्या परीक्षा होणार नाहीत; शिक्षण उपसंचालकांचे आदेश

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर (Maharashtra News) येऊन ठेपला असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्रात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. या सणाच्या धामधुमीच्या काळात  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचे नियोजन करू नये, अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी शाळांना दिल्या आहेत.

विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या (Maharashtra News) कोणत्याही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेऊ नयेत अशी सूचना सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त अनुदानित – विनाअनुदानित व इतर बोर्डाच्या शाळांना (School) दिल्या आहेत. दरम्यान गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांच्या लेखी, तोंडी अथवा प्रात्यक्षिक आदी कोणत्याही प्रकारच्या परीक्षा न घेण्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com