करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण क्षेत्रातील धक्कादायक (Maharashtra News) घटना महाराष्ट्रात उघड झाली आहे. कॉपी करण्याची ही घटना एखाद्या चित्रपटातील कथा वाटावी, या पद्धतीने सुरु आहे. कॉपी करणारे विद्यार्थी शाळेत विद्यार्थी नसून ते चक्क इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार मराठवाड्यातून समोर आला आहे. मराठवाड्यातील परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सामूहिक कॉफीचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
चक्क मोबाईल बाकावर ठेवून सुरु होती कॉपी
परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क मोबाईल समोर ठेवून कॉपी सुरु होती. सामूहिक कॉपीचा हा प्रकार नुकताच उघड झाला आहे. वर्गातील अनेक परीक्षार्थी कॉपी करताना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले पाहायला मिळत आहेत. कॉपीचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. परिणामी परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुखाला तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. नागनाथ आप्पा हलगी या महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शंभर ते दीडशे मोबाईल जप्त करण्यात आले
नागनाथ हालगे आप्पा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तपासल्यानंतर बहुतांश डमी विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे दिसून आले. बहुतांश विद्यार्थ्यांकडे (Maharashtra News) मोबाईल असल्याचे आढळून आले. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दरम्यान सर्रास मोबाईलचा वापर केला. सुमारे शंभर ते दीडशे मोबाईल सकाळच्या सत्रात जप्त करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक हॉल तपासणी करत असताना सर्रास मोबाईलचा प्रकार आढळून आला.
प्राध्यापकांसमोरच सुरु होती कॉपी (Maharashtra News)
परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर बंदी असून सुद्धा येथे चक्क प्राध्यापकांच्या समोर विद्यार्थी मोबाईलचा वापर करत होते. कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य आणि कॉलेजचा चिप्स सुप्रीडेंट यांना हा प्रकार माहिती असूनही कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही; हे विशेष. तसेच दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा प्रत्येक हॉलमध्ये दोन, तीन डमी विद्यार्थी होते. हा सर्व प्रकार विद्यापीठाने नियुक्त केलेले सहकेंद्र प्रमुख प्रा.दशरथ रोडे यांनी उघड केला आहे.
नागनाथ हालगे आप्पा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, परळी कॉलेजमध्ये सुरु असलेला कॉपीचा प्रकार पहा –pic.twitter.com/2P73LSLB7d
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com