Maharashtra Government : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तब्बल 2384 जागांवर भरती; महिन्याचा 1,32,000 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा येथे (Maharashtra Government) नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 2384 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
भरले जाणारे पद – केंद्रप्रमुख (Cluster Head)
पद संख्या – 2,384 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Maharashtra Government)
1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदेव्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
3. जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून 3 वर्षांपेक्षा कमी (Maharashtra Government) नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 41,800/- ते 1,32,300 रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला (Maharashtra Government)
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLCIK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com