स्थानिकांना खासगी नोकरीत 80% कोटा दिला जाईल – राज्यपाल कोश्यारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । विधानभवनात राज्य विधानसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी यांनी “भुमीपुत्रांना’ खासगी क्षेत्रातील नोकर्यांमध्ये 80% आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार कायदा करेल.” अशी घोषणा केली.

सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला बेरोजगारीची चिंता असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यपाल यांनी सरकारचा अजेंडा यावेळी स्पष्ट केला.

राज्यपालांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

-खाजगी क्षेत्रातील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी ८० टक्के आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करण्यात येणार. राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात येणार.

-स्थानिक सुशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासन नवे धोरण तयार करील.

-आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण मोफत देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. महिलांना समान संधी आणि त्यांची सुरक्षितता याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार.