महापरिक्षा पोर्टलला अखेर स्थगिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । राज्यात मेगाभरतीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महापरीक्षा पोर्टलला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्यात येईल असे आदेश दिलेत.

पुढील आठवड्यातील होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयाबाबत पुढील भूमिका स्पष्ट केली की, पोर्टल मधील त्रुटी दूर करुन इतर ऑनलाईन परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच घेण्याचे मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेत.

महापरीक्षा कारभाराबाबत अनेक दिवसांपासून परिक्षार्थी व पालक नाराज होते. अनेक गैरप्रकरणाच्या व इतर असुविधेच्या गोष्टींबाबत ही नाराजी होती. मात्र या निर्णयामुळे परिक्षार्थी यांच्यात आनंद व्यक्त होत आहे.