करिअरनामा ऑनलाईन । power sector मध्ये सुरक्षित आणि फायदेशीर करिअरची स्वप्न पाहत आहात का? MAHAGENCO महाराष्ट्राच्या भविष्याला ताकद देण्यासाठी 800 तंत्रज्ञ III (Technician III) व्यावसायिकांची भरती (MAHAGENCO Recruitment 2024) करत आहे. आकर्षक वेतन,आणि जगातील सर्वात मोठ्या वीज उत्पादन कंपनीत काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे. खरं तर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदासाठी नोव्हेंबर महिन्यात जाहिरात देण्यात आली होती. त्यामध्ये आता काही महत्वाचे अपडेट करण्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 ऐवजी 10 जानेवारी 2025 करण्यात आली आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा. सविस्तर माहिती खालील प्रमाणे..
रिक्त पदसंख्या- 800
पदाचे नाव- महानिर्मिती “तंत्रज्ञ-3” भरती 2024 (MAHAGENCO Recruitment 2024)
1) सामान्य श्रेणी – 400 ( सामान्य – महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार)
2) प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी – 160 ( महानिर्मिती कंपनीचे किमान 05 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार)
3) प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी – 160 (महानिर्मिती कंपनीचे 01 वर्षे ते 04 वर्षे कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार)
4)बी. टी. आ र. आय . साठीचे आरक्षण – 80 ( महानिर्मिती कंपनीच्या बी.टी.आर.आय अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार)
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
अर्ज पद्धती– ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख– 10 जानेवारी 2025
अर्ज कसा करावा? MAHAGENCO Recruitment 2024
या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अधिक माहितीकरिता इथे Click करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
https://mahagenco.in/