Maha Forest Recruitment : महाराष्ट्र वन विभाग भरतीबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या भरतीचा संपूर्ण तपशील

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा (Maha Forest Recruitment) निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारी दरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

वन विभागातील पद भरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

तसेच वन विभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा (Maha Forest Recruitment) कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात TCS सोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

भरती संदर्भात महत्वाच्या तारखा – (Maha Forest Recruitment)

  1. सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर 2022
  2. भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर 2022
  3. जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी 2023
  4. अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी 2023
  5. ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब्रुवारी 2023
  6. ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब्रुवारी 2023
  7. आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च 2023
  8. अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत 2023
  9. नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत 2023

महत्वाची सूचना –

वन विभागाच्या भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF जारी झाली आहे. या PDF मध्ये विविध जिल्ह्यांमधील 9 डिसेम्बर (Maha Forest Recruitment) रोजीचे पूर्ण विविरण दिलेले आहे. अर्ज प्रक्रिया 20 डिसेंबरपासून सुरू होईल. साधारणत: 20 ते 30 डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. 10 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. यामध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा; असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com