Linkedin Survey : नोकरी करणारेच आहेत नोकरीच्या शोधात; अहवालातून समोर आले धक्कादायक खुलासे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल नोकरी मिळवणे (Linkedin Survey) खूप अवघड झाले असताना अनेकजण नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एकीकडे नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत असताना दुसरीकडे असा अहवाल समोर येणं म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील सुमारे 88 टक्के नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. या लोकांना त्यांच्या सध्याच्या कंपनीतून अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे राजीनामा द्यायचा आहे.

लिंक्डइनने केलं सर्वेक्षण
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn ने 24 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान देशभरातील 1097 नोकरदार लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणादरम्यान असे समोर आले आहे; की प्रत्येक 100 नोकरदार लोकांपैकी 88 लोक त्यांच्या सध्याच्या नोकरीवर खुष नाहीत. त्यांना नोकरी (Linkedin Survey) बदलायची आहे. या सर्वेक्षणात अर्धवेळ आणि पूर्णवेळ अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला होता.

नोकरी बदलण्याचं मुख्य कारण काय?
लिंक्डइनने सर्वेक्षणाबाबत लोकांना अनेक प्रश्न विचारले, ज्यात ते काम करत असलेल्या कंपनीची कार्यसंस्कृती कशी आहे? तो त्याच्या पगारावर समाधानी आहे की नाही? त्याला नोकरी बदलायची असेल तर त्याची मुख्य कारणे कोणती? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. या अहवालानुसार असं समोर आलं आहे; की 42 टक्के लोकांना त्यांचे काम आणि आयुष्य यात संतुलन साधायचे आहे. तर 37 टक्के लोकांना पगारवाढीसाठी नोकरी बदलायची आहे.

नोकरी सोडून व्यवसाय सुरु करायचा (Linkedin Survey)
79 टक्के लोकांना त्यांची सध्याची नोकरी सोडून नवीन व्यवसायसुरु करायचा आहे. हे लोक त्यांच्या सध्याच्या पगार वाढीबद्दल अजिबात समाधानी नाहीत. त्यांना विश्वास आहे की त्यांनी नवीन व्यवसायात नशीब आजमावले तर त्यांची परिस्थिती सुधारू शकते.
रिझ्युमे बनवण्यासाठी डिजिटल फॉरमॅटची मदत
याशिवाय आता लोक नोकरीच्या शोधात रिझ्युमे बनवण्यासाठी डिजिटल फॉरमॅटचीही मदत घेत आहेत. अहवालानुसार, 72 टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी नोकरीसाठी (Linkedin Survey) डिजिटल रीझ्युमे तयार केला आहे, ज्यामध्ये त्यांनी व्हिडिओ फॉरमॅट देखील वापरला आहे. याशिवाय सुमारे 81 टक्के लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान नोकरी शोधण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com