करिअरनामा ऑनलाईन । आजच्या धकाधकीच्या जीवनात (Lifestyle) लोक आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरले आहेत. विशेषत: जे काम करत आहेत, त्यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे थोडे कठीण होत आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना कामाचा ताण तर असतोच, पण काही वेळा डेडलाईनमुळे कामाचे तासही वाढतात. याआधी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती म्हणाले होते की, तरुणांनी आठवड्यातील 70 तास काम करावे. पण हे खरच शक्य आहे का? या वक्तव्याने तुमचीही भंबेरी उडाली असेल ना?
आपण पाहतोय की एका व्यक्तीने एका दिवसात किती तास काम करावे; यावर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आजच्या व्यस्त जिवनशैलीत व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल साधणे कठीण झाले आहे. यासाठी एका दिवसात किती काम केले पाहिजे; हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यामुळे एखाद्या व्यक्तीने एका (Lifestyle) दिवसात किंवा आठवड्यात किती काम करावे, यावर वाद सुरू झाला आहे. असं असलं तरी, कामाच्या प्रचंड ताणामुळे बहुतेक लोकांमध्ये तणाव आणि नैराश्य वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने किती काम करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
दिवसात किती तास काम करु शकता?
कोणतेही कार्यालय, कंपनी किंवा संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना कामाचे 8 ते 9 तास नेमून देते. परंतु कामाच्या जीवनात समतोल राखण्यासाठी, आपल्या क्षमतांचे मूल्यांकन करणे तसेच वैयक्तिक मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कामाव्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे महत्त्वाचे आहे.
योगासनही आहे महत्त्वाचे (Lifestyle)
या प्रश्नावर योगतज्ञ असेही सांगतात की, तुम्ही किती वेळ झोप घेता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुम्ही 8 किंवा 9 तासांपेक्षा जास्त वेळ काम करू शकता. पण उत्पादकता वाढवण्यासाठी झोपेसोबतच ताण व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत उत्पादकता वाढवण्यासाठी योगाभ्यास करणे खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या मदतीने तुम्ही कामाच्या ठिकाणीही सक्रिय राहून तुमची सर्व कामे सहज पूर्ण करू शकाल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com