Legislative Council Election 2024 : पदवीधर आणि शिक्षक मतदानासाठी कशी करायची नाव नोंदणी? जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक (Legislative Council Election 2024) मतदारसंघाच्या 4 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई आणि कोकण विभागात पदवीधर तसेच मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यापार्श्वभुमीवर पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी कशी करावी? त्यासाठी कोण पात्र असणार आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….

पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्यक पात्रता (Legislative Council Election 2024)
1. पदवीधर मतदार नोंदणी करणारा मतदार भारताचा नागरीक असावा.
2. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्सम विद्यापीठाचा पदवीधर असावा.
3. मतदार सर्वासाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवाशी असावा.
4. त्याने विहित कागदपत्रांसह फाॅर्म क्र. १८ भरलेला असावा.
5. पदविका (Diploma) जर पदवीतूल्य असेल तरच पदवीधर पात्रता गृहीत धरण्यात येईल.

शिक्षक मतदार नोंदणीकरिता आवश्यक पात्रता
1. शिक्षक मतदार नोंदणी करणार मतदार भारताचा नागरीक असावा.
2. त्याने मतदार नोंदणीकरिता अर्हता (Legislative Council Election 2024) दिनांकाच्या लगतच्या ६ वर्षात किमान ३ वर्षे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून पूर्णवेळ काम केलेले असावे.
3. त्याने विहित कागदपत्रांसह फाॅर्म क्र. १९ भरावा.

पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे –
1. रहिवाशी पुरावा (पासपोर्ट, वाहन परवाना, टेलीफोन बील, लाईट बील याशिवाय मान्यताप्राप्त कागदपत्रांची छायांकित प्रत), 2. मार्कशीटची साक्षांकित प्रत,पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत. ओळखपत्र.
2. शिक्षक असल्यास नोकरी करीत असल्याबाबत (आजी किंवा माजी) प्राचार्यांचे पत्र, विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्यास त्याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्यास प्रतिज्ञापत्र.
महत्वाची सूचना – प्रमाणपत्रांचे साक्षांकन प्रती संबंधित (Legislative Council Election 2024) जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्यता प्राप्त विद्यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांकडून करून घ्यावे.

पदवीधर व शिक्षक मतदान प्रक्रिया अशी आहे –
मतदार नोंदणी अर्ज आणि कागदपत्राच्या साक्षांकित प्रती, आपल्या विधानसभा (Legislative Council Election 2024) मतदारसंघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), किंवा अन्य नामनिर्देशित अधिकारी यांना समक्ष किंवा पोस्टानेही सादर केल्या जाऊ शकतात. शक्यतो ही कागदपत्रे समक्ष सादर करून त्यांची पोहोच घ्यावी. तसेच अद्ययावत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर, त्यात स्वतःचे नाव असल्याची खात्री करावी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com